Monsoon Kitchen Hacks: पावसाळ्यात स्नॅक्स नरम पडतात? फॉलो करा या टिप्स

अनेक वेळा पदार्थ ओलसर ठिकाणी ठेवल्यास त्याला बुरशी येण्याची शक्यता असते.
Monsoon Kitchen Hacks: पावसाळ्यात स्नॅक्स नरम पडतात? फॉलो करा या टिप्स
Monsoon Kitchen Hacks: पावसाळ्यात स्नॅक्स नरम पडतात? फॉलो करा या टिप्सDainik Gomantak
Published on
Updated on

अनेकदा पावसाळ्याच्या दिवसांत( Rainy Day) आपल्या घरातील नाश्ता किंवा डब्यात ठेवलेल्या फराळासारख्या गोष्टी खराब होतात. यामुळे अनेक पदार्थ आपण फेकून देतो. तुम्हाला जर या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर या टिप्स (Tips) नक्की फॉलो करा.चला तर मग जाणून घेवूया या टिप्सबद्दल.

* ओलसर जागेपासून दूर ठेवावे

अनेक वेळा पदार्थ (Food) ओलसर ठिकाणी ठेवल्यास त्याला बुरशी (Fungus) येण्याची शक्यता असते. यामुळेच पदार्थ ओलसर ठिकाणी ठेवणे टाळावे. तसेच स्नॅक्सचे (Snacks) डब्बे जमिनीवर न ठेवता किचनच्या (Kitchen) कप्प्यात ठेवावे. पावसाळ्याच्या दिवसांत स्नॅक्स (Snacks) वातावरणातील आद्रतेमुळे (Atmospheric humidity) खराब होतात.

* प्लास्टिकच्या जारचा वापर टाळावा

पावसाळ्याच्या दिवसांत (Rainy days) , स्नॅक्स (Snacks) प्लास्टिकच्या डब्यात (Plastic Box) न ठेवता काचेच्या डब्यात (Glass Box) ठेवावे. प्लास्टिकच्या डब्यात स्नॅक्स (Snacks) ठेवल्यास लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून नमकीन पदार्थ (Snacks)काचेच्या डब्यात ठेवल्यास चांगले राहतात.

* सूर्यप्रकाशापासून संरक्षण

तुम्ही नेहमी असे एकले असेल की मसाले, डाळी , तांदूळ, गहू किंवा इतर पदार्थ उन्हात (Sun) ठेवल्याने चांगले राहतात. पण नमकीन (Snacks) पदार्थांच्याबाबतीत असे होत नाही. वातावरणातील आद्रता आणि ऊन यामुळे नमकीन पदार्थ खराब होण्याची शक्यता अधिक असते.

* या टिप्स देखील आहेत महत्वाच्या

* काचेच्या डब्यातून पदार्थ काढल्यानंतर त्याचे झाकण चांगले बंद करावे.

* एकत्रित नमकीन ठेवणे टाळावे.

* प्रत्येक पदार्थ वेगवेगळा ठेवावा.

* नमकीन पदार्थ काचेच्या डब्यात ठेवल्याने पावसाळ्याच्या दिवसात अधिक काळ सुरक्षित राहतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com