Monsoon Healthy Snacks: पावसाळ्याच्या दिवसात (Rainy Day) आपल्याला चहा (Tea), पकोडे तसेच गरम गरम समोसे (Samosa) खायला आवडतात. या दिवसांत चहा पाकोड्याशिवाय आरोगयास (Health) लाभदायी पदार्थ खावे. जे पदार्थ चवदार (Tasty) तसेच वजन कमी करण्यास मदत करतात. तज्ञांच्या मते, तळलेले पदार्थ जसे की, समोसा, पकोडा, टिक्की असे पदार्थ खाणे टाळावे. यामुळे वजन (Weight) वाढण्यास मदत मिळते. तसेच हे पदार्थ पचायला (Digest) देखील कठीण आहेत. तसेच पावसाळ्यात आपली पचणसंस्था हळूहळू काम करते. यामुळेच अशा वातावरणात सकस आहार (Healthy Diet) घ्यावा. ज्या पदार्थात कमी कॅलरी असून पौष्टिक असतील.
* ग्रील्ड फळ
उन्हाळ्यात आणि मान्सूनच्या दिवसांत आपल्याला विविध प्रकारचे फळे खायला मिळतात. तसेच काही फळे पावसाळ्यात एक चांगला गोड पदार्थ म्हणून देखील खाऊ शकतो. सगळ्यात आधी हंगामी फळांचे छोटे-छोटे तुकडे करून त्यात थोडे लिंबाचा रस मिक्स करावा. तयार आहे तुमचा आंबट-गोड ग्रील्ड फ्रूट. तसेच हा पदार्थ चवीला देखील स्वादिष्ट असतो.
* कॉर्न
अनेकांना हा गैरसज होतो की मका खाल्ल्याने आरोग्याला धोका पोहोचु शकतो. यात साखर असल्याने वजन वाढण्यास मदत मिळते. परंतु हे सत्य आहे की मका चवीला गोड आणि पौष्टिक असतो. सर्वांनाच पावसाळ्याच्या दिवसात मका खायला आवडते. याचा समावेश आपण स्नॅक्समध्ये करू शकतो. मक्याला मसाले आणि लोणी लावून भाजल्यास त्याची चव अधिक वाढते. पावसाळ्याच्या दिवसातील हा ट्रेंडिग पदार्थ आहे.
* मुरमुऱ्याची भेळ
मुरमुऱ्यात फेबारचे प्रमाण अधिक असते. यामुळे बद्धकोष्ठतेवर उपयुक्त असते. हे अँटी-ऑक्सिडंट्स, खनिजे आणि पौष्टिक घटकांनी समृद्ध आहे. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ति वाढविण्यास मदत करते. हा पदार्थ खाल्ल्याने इतर समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करते. एका भांड्यात 20 ग्रॅम मुरमुरे , धने चटणी , लाल चटणी , टोमॅटो , कांदा मिक्स करावे. तसेच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो केचअप देखील टाकू शकता.
* दही
कमी फॅट असणारे दही आपलय आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकते. यासाठी 100 ग्रॅम डबल टोन्ड दही घ्यावे लागेल.त्यात 5 ग्रॅम हंगामी फळे आणि बेरी घालाव्यात. संध्याकाळी हे स्नॅक खेळ योग्य आहे. दहीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असते. यामुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
* पॉपकॉर्न
पॉपकॉर्न सर्वांनाच माहिती आहे ,तसेच सर्वांच्या आवडीचा पदार्थ देखील आहे. पॉपकॉर्न चवीला जसा चवदार आहे तसाच आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक देखील आहे. पॉपकॉर्नमध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे उत्तम स्नॅक तयार होतो. तसेच तुम्ही जर अधिक प्रमाणात पॉपकॉर्न खाल्ले तर शरीरातील कॅलरीवर नियंत्रण ठेवता येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.