आजकाल सर्वांकडे स्मार्टफोन आहे. तसेच सर्वजण व्हॉट्सॲप वापरतात. युजर्सच्या गरजेनुसार त्यात रोज काही नवीन फीचर्स लाँच होत असतात. यापैकी एक म्हणजे स्टिकरचे मजेशीर फिचर लाँच झाले आहे. तुम्ही इमोजीमध्ये विविध बदल पाहिले असतील. पण आता तुम्ही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून स्वतःचे स्टिकर तयार करू शकता. तुम्हालाही तेच जुने स्टिकर-इमोजी तुमच्या मित्र आणि जवळच्या लोकांसोबत शेअर करण्याचा कंटाळा आला असेल, तर पुढील सेटिंग करून तुम्ही स्टिकर तयार करू शकता.
अशी करा सेटिंग
स्टिकर्स बनवण्यासाठी सर्वात पहिले WhatsApp ओपन करावे
यानंतर, कोणत्याही चॅटवर क्लिक करा आणि स्टिकर विंडो उघडण्यासाठी स्माइली आयकॉनवर क्लिक करा.
येथे तुम्हाला Make your Own Stickers नावाचा पर्याय दिसेल.
तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
यानंतर Create वर क्लिक करा.
याशिवाय, येथून तुम्ही तुमचा फोटो निवडून स्वतःचे स्टिकर देखील तयार करू शकता.
यासाठी तुम्ही स्टिकरच्या पर्यायावर टॅप करताच तुम्हाला फोटो अपलोडचा पर्याय दिसेल.
ज्या फोटोवरून तुम्हाला स्टिकर बनवायचे आहे तो फोटो निवडा. यानंतर तुमचे स्टिकर तयार होईल.
स्टिकर मेकर अॅपची घ्या मदत
तुम्ही Google Play Store किंवा Apple App Store वरून स्टिकर मेकर ॲप डाउनलोड करू शकता. त्यात देखील स्टिकर्स तयार करू शकता. यासाठी सर्वात पहिले ॲप ओपन करा आणि ते डाउनलोड करा आणि नवीन स्टिकर पॅक तयार करा वर क्लिक करा. येथून तुम्ही तुमचा फोटो अपलोड करू शकता आणि तुमच्या गरजेनुसार एडिट करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात काही मजकूर किंवा इमोजी देखील अॅड करू शकता. यानंतर, तुम्ही सेव्ह बटणावर क्लिक करताच तुमचे स्टिकर तयार होईल. तुम्ही मित्रांसह शेअर करू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.