Breakup: एखाद्या विशिष्ठ परिस्थितीत स्त्री आणि पुरुष त्याला कसे सामोरे जातात किंवा ब्रेकअप झाल्यानंतर स्त्री आणि पुरुषांचे वागणे कसे असते याची अनेकांच्या मनात उत्सुकता असते. आज आपण जाणून घेऊयात ब्रेकअप झाल्यानंतर स्त्री आणि पुरुष यांच्या वागण्यात नक्की काय फरक असतो.
1. व्यक्त होणे
अनेकदा असे दिसून येते की पुरुषांना ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करणे जड जाते. समाजाने घालून दिलेले नियम किंवा तुम्ही पुरुष असल्याने पुरुषाने कसे कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनावर ताबा ठेवला पाहिजे अशा शिकवणीमुळे त्यांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत.
याउलट स्त्रीयांना आपल्या भावना व्यक्त करणे सोपे जाते. आपल्या मित्रमैत्रीणी, कुटुंब यांच्याबरोबर बोलून आपले मन त्या हलके करु शकतात. याबरोबरच त्यांच्याशी संवाद साधून ब्रेकअपवर त्यांना त्याबद्दल काय वाटते हे जाणून घेता येणे पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांसाठी सोपे असते.
2. ब्रेकअप झाल्यानंतर या गोष्टी करतात स्त्री आणि पुरुष
ब्रेकअपच्या सामोरे जाण्यासाठी किंवा त्या भावनिक गुंत्यातून बाहेर पडण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघेही आपापल्या आय़ुष्यात अनेक नवीन गोष्टींचा अवलंब करतात. जसे की अनेकदा काही पुरुष स्वताला कामात बिझी ठेवतात, आपल छंद जोपासतात किंवा काहीतरी नवीन साहस शोधण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे, स्त्रीया स्वत:ला प्राधान्य देण्यास सुरुवात करतात, स्वत:ची काळजी घेणे , थेरेपी घेणे हे पाहणे अशा गोष्टी करण्यास सुरुवात करतात. स्त्री-पुरुषांनी अवलंबलेले दोन्ही मार्ग आपापल्या दु:खातून बाहेर येण्याचे मार्ग असतात.
3. सामाजिक संबंध
स्त्रीयांच्या वागण्याचा विचार केला असता स्त्रीया ब्रेकअपनंतर स्वत:च्या भावनिक गरजांसाठी आपल्या सामाजिक संबंधावर अवलंबून असतात. आपल्या आसपासच्या लोकांशी, जवळच्या व्यक्तीवर बोलून त्या आपल्या भावनांना वाट करुन देतात. याउलट पुरुष ब्रेकअप झाल्यानंतर स्वत:वर अवलंबून राहणे पसंत करतात. आपल्या भावना दुसऱ्यासमोर उलगडणे त्यांना अवघड वाटते त्यामुळे ते स्वत:च आपल्या भावनांना सांभाळतात.
4. ब्रेकअपमागची कारणे शोधणे
ब्रेकअप का झाले किंवा नात्यामध्ये दुरावा का आला याची कारणं शोधण्याचे महत्वा स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळे असते. स्त्रियांना अनेकदा ब्रेकअपची कारणे समजून घेण्याची तीव्र इच्छा असते. त्या आपल्या जोडीदाराशी संवाद साधून कारणे शोधण्याचा प्रयत्न करू शकतात. याउलट, पुरुष भूतकाळावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भविष्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्राधान्य देऊ शकतात.
5. ब्रेकअपचे परिणाम
ब्रेकअपनंतर स्त्रिया सहसा आत्मनिरीक्षण करतात. त्या अनुभवातून धडे घेतात आणि स्वत: ची सुधारणा करण्याची संधी म्हणून त्याचा वापर करतात. महिला स्वत: ची काळजी घेण्यास प्राधान्य देऊ शकतात. स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी स्त्रीया कष्ट घेतात. दुसरीकडे, पुरुष पुढे जाण्याला प्राधान्य देऊ शकतात आणि भूतकाळात खोलवर विचार करण्याऐवजी भविष्यातील ध्येयांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात.
ब्रेकअप झाल्यानंतर या वरील परिणांमाशिवाय आरोग्यावर देखील परिणाम होतो. शारीरीक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. काहीवेळा तज्ञ लोकांची मदत घ्यावी लागते. याबरोबरच, पुरुष ब्रेकअपनंतर जून्या नात्यातून बाहेर येण्यासाठी नवीन नात्याचा शोध घेऊ शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.