Medicinal Plants या घरात असल्याच पाहिजेत

औषधी वनस्पती घरात लावल्यास त्याचा आरोग्याला फायदा होतो.
Medicinal Plants या घरात असल्याच पाहिजेत
Medicinal Plants या घरात असल्याच पाहिजेत Dainik Gomantak
Published on
Updated on

कोरोना (Corona) काळात वनस्पतींचे महत्व अधिक चांगल्या प्रकारे लक्षात आल्यानंतर लोकांनी आता घरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोपे लावायला सुरुवात केली आहे. ज्यांच्या घरात गार्डन आहेत, ते विविध प्रकारचे झाडे लावत आहेत. पण ज्यांच्या घरात जागा कमी आहे ते लोक सुद्धा कुंड्यामध्ये रोपे लावत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही पाच औषधी वनस्पतींबद्दल सांगणार आहोत. यामुळे तुमच्या आरोग्याला (Health) देखील फायदा होईल.

* गिलोय (Giloy)

जर तुम्ही घरात रोपे लावत असला तर तुमच्या घरात गिलोय नक्की लावा. ताप,सर्दी यासारख्या गोष्टी दूर करण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास गिलोय लाभदायी ठरते. यात अँटी-एजिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेसंबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.

* कोरफड (Aloe vera)

कोरफडचे त्वचेसह आरोग्यास देखील अनेक फायदे आहेत. कोरफडचा रस आरोग्यासाठी उत्तम मनाला जातो. तसेच कोरफड जेल त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करते.

Medicinal Plants या घरात असल्याच पाहिजेत
Vastu Tips: या दिशेला खिडकी असल्यास, भासणार नाही पैशाची कमतरता

* गवती चहा (Lemon Grass)

गवती चहाचे अनेक फायदे होतात. गवती चहा पिल्याने पचन संस्था सुरळीत कार्य करते. तसेच अंगदुखी, घसा खवखवणे, डोके दुखी यासारख्य समस्या दूर होतात.

* तुळस (Basil)

तुळस हि एक औषधीयुक्त वनस्पती आहे. तुळशीचे पाने वजन कमी करण्यास मदत करते, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनवते. तसेच मुरूम, सुरकुत्या यासारख्य त्वचेच्या समस्या देखील कमी करते .

* पुदिना (Mint)

प्रत्येक घरात पुदिनाचे रोप असायला हवे. पुदिन्याच्या पानाचे अनेक प्रकारे सेवन करता येते. पुदिन्याच्या पानांची चटणी तयार करून सेवन करू शकता. तसेच उन्हाळ्यात जळजळ, मुरूम यासारख्या समस्यापासून सुटका मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com