Food Not To Eat With Mango: 'या' पदार्थांसह चुकूनही खाऊ नका 'हे' फळ, नाहीतर होईल...

अनेक लोक जेवण करतांना आंबे खातात. पण तुमच्या आरोग्यासाठी ही गोष्ट हानिकारक ठरु शकते.
Mango
Mango Dainik Gomantak

Food Not To Eat With Mango: आंबा हे फळ कोणाला खायला आवडत नाही...!!! शरीरातील अनेक पोषक तत्वांची कमतरता आंबा खाल्ल्याने दूर होऊ शकते यात शंका नाही.

मात्र आंबा खाताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतल्यावरच या फळातून पोषक तत्वांचा खजिना तुम्हाला मिळू शकेल. चला तर मग जाणून घेउया की आंब्यासह कोणते फळ खाणे टाळावे.

चुकूनही या गोष्टी आंब्यासोबत खाऊ नका

1. कारला

लोकांना उन्हाळ्यात कारला खायला आवडतो. जेव्हा लोक कारल्याची करी खाताना आंबे खाऊ लागतात तेव्हा काळजी वाढते. तुम्हीही असेच करत असाल तर आजपासूनच हे करणे बंद करा, कारण आंब्यासोबत कारले खाल्ल्याने मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.

Bitter Gourd
Bitter GourdDainik Gomantak
Mango
Somvar: सोमवारी चुकूनही करू नका 'हे' काम, जाणून घ्या या दिवसाशी संबंधित नियम

2. मसालेदार अन्न

जर तुम्ही कोणतेही मसालेदार पदार्थ खात असाल तर चुकूनही आंब्याला हात लावू नका. कारण असे केल्याने पोट खराब होउ शकते.

Fast Food
Fast FoodDainik Gomantak

3. पिण्याचे पाणी

अनेक लोक जेवण करतांना पाणी पिणे टाळतात. तसेच आंबा हे फळ खाल्यावर देखील पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.  कारण असे केल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो.

Drinking Water
Drinking Water Dainik Gomantak

4. दही

लोकांना जेवताना अनेकदा दही खायला आवडते आणि दह्याबरोबरच त्यांना आंब्याची मजाही येऊ लागते. तुम्हीही दह्यासोबत आंबा खात असाल तर पुन्हा अशी चूक करू नका. कारण असे केल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

Curd
CurdDainik Gomantak

5. कोल्ड ड्रिंक

आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड्रिंक पिऊ टाळावे. कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी तर वाढतेच पण तुमच्या पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Cold Drinks
Cold DrinksDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com