Malaria: मलेरिया किती घातक? निष्काळजीपणा ठरु शकतो जीवघेणा; जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

Malaria Treatment And Care: मलेरिया हा आजार डासांच्या चाव्यामुळे होतो. या आजारावर उपचार करता येतात, परंतु जर या आजाराकडे दुर्लक्ष केले तर तो जीवघेणा देखील ठरु शकतो. दरवर्षी जगभरात 4 लाखांहून अधिक लोक या आजारामुळे आपला जीव गमावतात.
Malaria Treatment And Care
MalariaDainik Gomantak
Published on
Updated on

मलेरिया हा आजार डासांच्या चाव्यामुळे होतो. या आजारावर उपचार करता येतात, परंतु जर या आजाराकडे दुर्लक्ष केले तर तो जीवघेणा देखील ठरु शकतो. दरवर्षी जगभरात 4 लाखांहून अधिक लोक या आजारामुळे आपला जीव गमावतात. मादी अ‍ॅनोफिलीस डास प्लास्मोडियम परजीवी वाहक असते. चावल्यानंतर डास शरीरात हा परजीवी सोडतो. हा परजीवी यकृतापर्यंत पोहोचतो आणि नंतर रक्तात मिसळतो.

सुरुवातीची लक्षणे

दरम्यान, मलेरियाच्या (Malaria) सुरुवातीच्या लक्षणांमध्ये सर्दी, तीव्र ताप आणि नंतर तापमान हळूहळू सामान्य होत जाणे आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मलेरिया होतो तेव्हा त्याला पहिल्यांदा थंडी वाजते आणि नंतर खूप ताप येतो. यानंतर, घाम येणे सुरु होते आणि ताप कमी होऊ लागतो. ताप कमी होतो असे दिसते, पण काही काळानंतर पुन्हा तेच चक्र सुरु होते. याशिवाय, डोकेदुखी, थकवा, उलट्या आणि जुलाब अशा तक्रारी सुरु होऊ शकतात. जर तुम्हाला तापासोबत ही सर्व लक्षणे जाणवत असतील तर सावध राहा. मलेरियाबाबत निष्काळजीपणा जीवघेणा ठरु शकतो.

Malaria Treatment And Care
Malaria Vaccine: कोरोनानंतर आता येणार मलेरियाचे Vaccine, चार महिन्यांत होणार देशभरात लसीकरण

प्रतिबंधात्मक उपाय

अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. संचयन रॉय सांगतात, डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करा. तुमचे घर आणि कामाचे ठिकाण स्वच्छ ठेवा. डासांची पैदास होऊ देऊ नका. मलेरियाचा डास दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी चावतो, म्हणून सावधगिरी बाळगा. तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा. तुमच्या आहाराची काळजी घ्या आणि जास्त पाणी प्या.

Malaria Treatment And Care
World Malaria Day 2023: मलेरिया दिवस का अन् केव्हा सुरू झाला, वाचा एका क्लिकवर

डॉक्टरांना कधी भेटायचे

जर तुम्हाला सर्दी झाल्यानंतर सतत ताप येत असेल आणि घाम आल्यानंतर ताप कमी होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी (Doctors) संपर्क साधा. इतर कोणतीही लक्षणे दिसण्याची वाट पाहू नका. जर लूज मोशन आणि उलट्या देखील सुरु झाल्या असतील तर तुमच्यासाठी ही आपत्कालीन परिस्थिती आहे. या परिस्थितीत कोणतीही निष्काळजीपणा करु नये आणि त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. या परिस्थितीत विलंब घातक ठरु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com