Makeup Tips: दुर्गापुजेसाठी मेकअप करताय? फॉलो करा 'या' खास टिप्स

दुर्गापुजे खास दिसायचे असेल तर तुम्ही पुढिलप्रमाणे मेकअप करू शकता.
Makeup Tips
Makeup TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Makeup Tips: नवरात्री हा सण स्त्री शक्तीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. आजपासून नवरात्री सुरू झाली आहे. या नऊ दिवसात माता दुर्गेच्या नऊ रुपाची मनोभावे पुजा केली जाते. पण पुजेसाठी मेकअप कसा करावा हे अनेक महिलांना कळत नाही. तुम्ही पुढिल काही टिप्स फॉलो करून सुंदर दिसु शकता.

डोळ्यांचा मेकअप

परफेक्ट दिसायचे असेल तर डोळ्यांचा मेकअप देखील परफेक्ट असावा लागतो. दुर्गापूजेसाठी मेकअप करताना डोळ्यांचा मेकअप नक्की करावा. यासाठी लोअर लॅश लाइन आणि वॉटरलाईनवर आयलाइनर पेन्सिल लावा आणि नंतर ब्रश वापरून ते स्मोकी बनवा. यानंतर, ब्लॅक जेल आयलाइनर आणि तुमची आवडते आय शॅडो लावावे. ज्यामुळे तुमचे डोळे अधिक आकर्षक दिसतील.

ग्लोइंग स्किन

दुर्गापूजेदरम्यान तुमची त्वचा ग्लोइंग राहावी असे वाटत असेल, तर फाउंडेशन लावण्यापूर्वी गालावर लिक्विड हायलाइटर लावावे. यामुळे तुमची त्वचा ग्लोइंग दिसेल. हायलाइट्स लावल्यानंतर चेहऱ्यावर तुमचे आवडते फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट पावडर लावावे. यामुळे तुमच्या त्वचेवर मेकअप चांगला सेट होईल. मेकअप करताना वॉटरप्रूफ प्रोडक्ट वापरावे. यामुळे चेहऱ्याचा मेकअप करताना तुमच्या डोळ्यांचा मेकअप खराब होण्यापासून वाचेल.

जाड आणि सुंदर भुवया

जाड आणि सुंदर भुवया केवळ डोळ्यांचे नाही तर चेहऱ्याचे सौंदर्यही वाढवते. यामुळे मेकअप करताना भुवयांना योग्य आकार देणे महत्वाचे आहे. यासाठी सर्वात पहिले आयब्रो पेन्सिल भुवयांवर लावावी आणि नंतर ब्रशने आयब्रो सेट करावे. आयब्रो पेन्सिलचा रंग तुमच्या भुवयांच्या रंगासारखाच असावा. प्रत्येक महिलेकडे आयब्रो पेन्सिल असावी.

लिपस्टिक

मेकअप पूर्ण करण्यासाठी चांगल्या रंगाची लिपस्टिक निवडणे महत्वाचे आहे. यामुळे तुमचे ओठ अधिक सुंदर दिसतात. जे मेकअप परफेक्ट दिसण्यास मदत करते. लिपस्टिक लावण्यापूर्वी, आपल्या ओठांवर प्राइमर लावा, जेणेकरुन लिपस्टिक बराच वेळ राहतील. यानंतर लिप लाइनर लावावे.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com