Home Remedies for Dry Hair: या घरगुती उपायांनी कोरड्या केसांना बनवा चमकदार बनवा

Home Remedies for Dry Hair: कोरडे केस तुमचे सौंदर्य कमी करतात. जेव्हा केस विंचरले जातात तेव्हा असे दिसते की अर्ध्याहून अधिक केस कंगव्यानेच बाहेर येतील.
Home Remedies for Dry Hair
Home Remedies for Dry HairDainik Gomantak
Published on
Updated on

Home Remedies for Dry Hair: कोरडे केस तुमचे सौंदर्य कमी करतात. जेव्हा केस विंचरले जातात तेव्हा असे दिसते की अर्ध्याहून अधिक केस कंगव्यानेच बाहेर येतील. जर तुम्हालाही कोरड्या केसांचा त्रास होत असेल तर सर्वप्रथम त्याचे कारण जाणून घेणे गरजेचे आहे.

Home Remedies for Dry Hair
Anant Chaturdashi 2023: अनंत चतुर्दशीला 'हा' धागा बांधल्यास पुर्ण होईल इच्छा

केमिकल बेस्ड शॅम्पूचा वापर, जास्त सूर्यप्रकाश, ताणतणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यांसारख्या अनेक गोष्टींमुळे कोरडे आणि निर्जीव केस होऊ शकतात. त्यामुळे या गोष्टींकडे आधी लक्ष द्या. याशिवाय काही घरगुती उपायांनीही तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता. त्याबद्दल येथे जाणून घ्या.

केळी

एक पिकलेले केळ घ्या. त्यात दोन चमचे मध आणि 1/३ कप खोबरेल तेल घाला. साधारण अर्धा तास केसांवर ठेवा. नंतर धुवा. केसांचा कोरडेपणा दूर होऊ लागतो.

मध

केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी केसांच्या लांबीनुसार एक किंवा अर्धा कप पाणी घ्या. त्यात एक चमचा मध घाला. नंतर केसांना लावा अर्ध्या तासानंतर सामान्य पाण्याने धुवा.

खोबरेल तेल

नारळाचे तेल खराब झालेल्या केसांवर जादूचे प्रभाव दाखवते. हे केवळ कोरडेपणाची समस्या दूर करत नाही तर केसांना खोल मॉइश्चरायझ करते आणि त्यांची लांबी देखील वाढवते. कोरडेपणा दूर करण्यासाठी खोबरेल तेल थोडे गरम करून केसांना लावा आणि किमान अर्धा तास ठेवा आणि नंतर शॅम्पू करा. हे आठवड्यातून 2-3 वेळा करा.

दही आणि कोरफड

दह्यामध्ये असलेले प्रोटीन केसांसाठी खूप फायदेशीर आहे आणि एलिव्होरा जेल केसांशी संबंधित बहुतेक समस्यांवर उपाय आहे. यासाठी कोरफडीचे जेल आणि दही प्रत्येकी एक चमचा घेऊन ते चांगले मिसळून मास्क बनवा. याने टाळूला 5 मिनिटे मसाज करा, सुमारे 10 मिनिटे ठेवा आणि नंतर शॅम्पू करा.

सफरचंद व्हिनेगर

केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी दोन चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर दोन कप पाण्यात मिसळा. शॅम्पू केल्यानंतर, सफरचंद सायडर व्हिनेगरच्या पाण्याने केस धुवा, काही वेळ केसांवर राहू द्या आणि नंतर सामान्य पाण्याने धुवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com