बकरी ईदला बनवा 'हे' चार खास पदार्थ

बकरी ईद (Bakari Eid) या खास दिवशी क्लासिक मटन कबाब (Mutton kabab) बनवू शकता
You can make a classic mutton kabab on this special day of Bakari Eid
You can make a classic mutton kabab on this special day of Bakari EidDainik Gomantak
Published on
Updated on

Bakari Recipe : उद्या जगभरात बकरी ईद (Bakari Eid) साजरी केली जाणार. मुस्लिम समाजातील लोकांसाठी हा सण अतिशय महत्वाचा असतो. या दिवशी बकरीचा बळी दिला जातो. यालाच त्यागाचा दिवस सुद्धा म्हटले जाते. बकरी इदच्या दिवशी (Bakari Eid) बकरीचे मास तीन भागात विभागले जातात. पहिला भाग हा कुटुंबाला , दूसरा भाग मित्रांना तर तिसरा भाग गरजू लोकांना दिले जाते. अशा सणाच्या (Festival) दिवशी विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. तसेच घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले जाते. तुम्हाला सुद्धा तुमचा सण खूप खास बनवायचा असेल तर काहीतरी चवदार पदार्थ बनवायचा प्रयत्न करू शकता.

You can make a classic mutton kabab on this special day of Bakari Eid
Monsoon Health Care : वजन कमी करण्यासाठी घ्या 'असा' आहार

मटन कबाब

कबाब हे प्रत्येक पार्टीमध्ये असतेच. हा पदार्थ सर्वाना खूप आवडतो. तसेच हा पदार्थ चवदार असतो. म्हणूनच या खास दिवशी क्लासिक मटन कबाब बनवू शकता. यात आल्याच्या लसूण पेस्टबरोबर पुदिना तसेच सौम्य मसाले टाकून घरीच तयार करू शकता.

शीर खुरमा

ईद या महत्वाच्या सणाच्या दिवशी तयार केला जाणारा हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. यात शेवळ्या, खजूर , सुकामेवा, आणि दूधाचे मिश्रण एकत्र करून तयार केली जाते. जर तुम्ही ईडच्या दिवशी खिया गोड पदार्थ बनवायचा विचार करत असला तर , शीर खुरमा नक्की बनवा. हे गोड पदार्थ बनवायला अगदी सोपे आहे. तसेच हा पदार्थ बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही. तसेतर हा पदार्थ बकरी ईदच्या दिवशी नाश्ता म्हणून बनवला जातो. परंतु तुम्ही या पदार्थांचा आनंद दिवसभर देखील करू शकता.

You can make a classic mutton kabab on this special day of Bakari Eid
Health Tips: उपाशीपोटी ‘हे’ पदार्थ तुम्ही खात असाल तर सावधान!

नल्ली भुणा

ईद या खास सणाच्या दिवशी नल्ली भुणा बनवण्याची परंपरा आहे. ही एक खास मुघलाईन मटण रेसिपी आहे. त्यात जायफळ पावडर , दालचीनी, लवंग बरोबर अनेक मसाल्यांनी भरलेले असते. नल्ली भुणा या पदार्थात मटणचे तुकडे न टाकता करीमध्ये शिजवलेल्या मटणाचा समावेश केला जातो. हा पदार्थ ईदच्या निमित्याने खास बनवल्या जाते. या पदार्थाला तुम्ही रोटी किंवा बटर नान सोबत खावू शकता. तसेच या पदार्थांची चव वाढवण्यासाठी तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता.

अवधी बिर्याणी

अवधी बिर्याण ही लखनौ मध्ये प्रसिद्ध आहे. या बिर्याणीमध्ये मसाले व्यवस्थित मिक्स केले जातात. यामुळे बिर्याणी चवदार होते. या बिर्याणीमध्ये तांदूळच्या वर मटन टाकल्या जाते. यावर केसरचे दूध टाकल्या जाते. ईदच्या दिवशीच ही बिर्याणी बनवली जाते. हे बनवायला वेळ लागतो. परंतु खायला खूप चवदार असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com