भगवान महावीरांची शिकवण तुमच्या आयुष्यात पडेल उपयोगी

देशभरात आज भगवान महावीर यांची जयंती देशभरात साजरी होत आहे.
Mahavir Jayanti 2022
Mahavir Jayanti 2022 Dainik Gomantak
Published on
Updated on

आज देशभरात जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती साजरी होत आहे. चैत्र महिन्यातील त्रयोदशी तिथीला त्यांचा जन्म झाला. महावीर यांचा जन्म एका राजघराण्यात झाला होता, पण वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी सर्व सांसारिक सुखांचा त्याग केला. यानंतर ज्ञानाच्या शोधात त्यांनी 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. महावीर स्वामींनी जैन धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी मोठे योगदान दिले आहे. मगध आणि अनेक प्रजासत्ताकांमध्ये आपली मुळे प्रस्थापित केल्यानंतर त्यांनी जैन धर्माचा दक्षिण भारतातही प्रसार केला. महावीर जयंतीनिमित्त जाणून घेऊया महावीर स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यात नक्कीच उपयोगी पडतील.

* प्रत्येकाला सुख आवडते, दुःख चांगले नसते. हिंसा प्रत्येकासाठी वाईट आहे. प्रत्येकाला जगायला आवडते. सर्व सजीवांना जगणे आवडते. प्रत्येकाला जीवन आनंदी जगायला आवडते.

* देवाचे वेगळे अस्तित्व नाही. योग्य दिशेने प्रयत्न केले तर देवत्व प्राप्त होऊ शकते.

* तुम्हाला जस दु:ख आवडत नाही तसेच इतरांनाही ते आवडत नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीशी योग्य व्यवहार करावा.

* ज्या लोकान जीवन जगताना कोणताही हेतु नसतो, त्यांनी उपवास, धार्मिक आचार नियमांचे पालन करून आणि ब्रह्मचर्य आणि तपांचे पालन करूनही निर्वाण प्राप्त होणार नाही.

* सर्व प्राणिमात्रांप्रती अहिंसक राहिले पाहिजे. खरा आत्मसंयम तोच असतो जो मनाने, शब्दाने आणि शरीराने कोणावरही हिंसा करत नाही.

* अहिंसा हा सर्वात मोठा धर्म आहे. या जगातील सर्व प्राणिमात्रांवर दया करा.

* जिंकल्याचा कधीच अभिमान नसावा, हरल्याचं दु:ख नसावं. ज्याने भीतीवर विजय मिळवतो तोच समता अनुभवू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com