Tambdi Surla: महाशिवरात्र विशेष! बाराव्या शतकात गोव्यात उभारण्यात आलेल्या महादेव मंदिराचा इतिहास आणि महत्व

Mahadev Temple at Goa: तुम्ही जर गोव्यात असाल तर तांबडी सुर्ला येथील हिरव्यागार वनराईत वसलेले जगप्रसिद्ध महादेव मंदिरला नक्की भेट द्या.
Shree Mahadev Temple at Tambdi Surla
Shree Mahadev Temple at Tambdi Surla Dainik Gomantak
Published on
Updated on

mahashivratri special goa tourism Shri Mahadev Temple at Tambdi Surla goa

देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री ८ मार्चला साजरी केली जाणार आहे. या दिवशी शिवभक्त महादेवाच्या मंदिरात जावून मनोभावे पुजा करतात. असे मानले जाते की या दिवशी विधीवत आणि मनोभावे महादेवाची पुजा केल्यास इच्छा पुर्ण होतात. तुम्ही जर सध्या गोव्यात असाल तर तांबडीसुर्ला येथील महादेव मंदिराचे दर्शन घेऊ शकता.

या महादेव मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख मिळाली आहे. येथे देश-विदेशातून अनेक पर्यटक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येत असतात. महाशिवरात्री आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची अलोट गर्दी पाहायला मिळते.

हे शिव मंदिर 12व्या शतकात पूर्वाभिमुख बेसॉल्ट दगडात कोरलेले सुंदर मंदिर आहे. हे मंदिर इतक्या अचूकतेने बांधले गेले होते की पहाटेच्या वेळी सूर्याची किरणे थेट मुर्तीवर पडतात.

Shree Mahadev Temple at Tambdi Surla  Goa
Shree Mahadev Temple at Tambdi Surla GoaDainik Gomantak

तांबडीसुर्लातील हिरव्यगार वनराईत वसलेले हे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. शिवाय मंदिराच्या सभोवताली आकर्षक बाग आणि निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटक या मंदिराकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात.

Mahadev Temple at   Goa
Mahadev Temple at GoaDainik Gomantak

गोव्यातील तांबडी सुर्ला महादेव मंदिर खुप खास आहे. कारण गोव्यातील हे एकमेव मंदिर आहे जे मुस्लिम आक्रमण आणि पोर्तुगीज आक्रमणानंतरही नष्ट झाले नाही. खरं तर मिळालेल्या माहितीनुसार मुस्लिम आक्रमण आणि पोर्तुगीज आक्रमणापूर्वी गोव्यात अनेक मंदिरे होती. खरं तर पोर्तुगीजांच्या आक्रमणापूर्वी ते हिंदूबहुल क्षेत्र होते. परंतु या आक्रमणांमुळे गोव्यातील अनेक मंदिरांचे नुकसान झाले आणि त्यामुळे अनेक मंदिरे पूर्णपणे नष्ट झाली. पण तांबडी सुर्ला महादेव मंदिर या हल्ल्यांपासून दूर राहिले.

Shree Mahadev Temple at Tambdi Surla  Goa
Shree Mahadev Temple at Tambdi Surla GoaDainik Gomantak

कसे पोहोचाल


गोव्याची राजधानी पणजीपासून तांबडी सुर्ला 65 किलोमीटर अंतरावर आहे. हे मोलेमपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर घनदाट जंगलात वसलेले आहे. तुम्ही फ्लाइट, ट्रेन, बस, टॅक्सी आणि तुमच्या वैयक्तिक मार्गाने गोव्याच्या तांबडी सुर्ला मंदिरात पोहोचु शकता.

जर तुम्ही तांबडी सुर्ला मंदिरात जाण्यासाठी हवाई मार्ग निवडला असेल तर विमानतळावरून तुम्ही स्थानिक वाहतुकीद्वारे तांबडी सुर्ला मंदिरात पोहचु शकता.

जर तुम्ही ट्रेनने जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन थिविम निवडू शकता. रेल्वे स्थानकापासून तांबडी सुर्ला मंदिराचे अंतर अंदाजे 58 किलोमीटर आहे.

तसेच तुम्ही टॅक्सी किंवा भाड्याने मिळणाऱ्या दुचाकीचा वापर करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com