Mahashivratri Upwas Recipe: महाशिवरात्रीच्या उपवासाला बनवा साबुदाण्याची खीर, दिवसभर जाणवणार नाही थकवा

Sabudana Kheer Recipe in Marathi: महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर साबुदाण्याची खीर नक्की बनवा. ही खीर खाल्यामुळे दिवसभर अशक्तपणा जाणवणार नाही.
Mahashivratri 2024 Special Upwas Recipe | Sabudana Kheer Recipe in Marathi
Mahashivratri 2024 Special Upwas Recipe | Sabudana Kheer Recipe in MarathiDainik Gomantak
Published on
Updated on

Sabudana Kheer Recipe

यंदा महाशिवरात्री 8 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. देशभरातील अनेक मंदिरांमध्ये सजावट करण्यात आली आहे. या दिवस भगवान शंकराची मनोभावाे पुजा केल्यास अनेक समस्या कमी होतात. भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी लोक त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण करतात तसेच उपवास देखील करतात. जर तुम्ही महाशिवरात्रीला उपवास करत असाल तर यंदा साबुदाणा खीर नक्की बनवून पाहा. हे फक्त खाण्यासाठीच चविष्ट नाही, तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही. चला तर मग जाणून घेऊया साबुदाणा खीर कशी बनवतात.

Mahashivratri 2024 Special Upwas Recipe | Sabudana Kheer Recipe in Marathi
jackfruit Curry Recipe: अस्सल गोवन चवीची मसालेदार 'फणसाच्या भाजीची' सोपी रेसिपी!

साबुदाणा खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients)

  • दूध - 1 लिटर

  • साबुदाणा - 4 चमचे

  • साखर – 6 टेबलस्पून

  • विलायची पाउडर – 1 टीस्पून

  • पाणी - 1 कप

साबुदाणा खीर बनवण्याची पद्धत (Process)

  • सर्वात पहिले साबुदाणा स्वच्छ धुवावा आणि 15-20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवावा.

  • नंतर त्यातील पाणी वेगळे करावे. एका बाजूला दूध गरम करा आणि त्यात 4-5 चमचे पाणी मिक्स करावे.

  • नंतर गॅस मध्यम ठेवावा आणि कढईत दूध उकळू घ्यावे.

  • दुधाला 3-4 उकळी आल्यावर त्यात शाबुदाणा टाका आणि अधूनमधून ढवळत राहावे.

  • साबुदाणा चांगला शिजल्यावर त्यात साखर आणि विलायची पावडर मिक्स करू शकता.

  • साखर घातल्यानंतर आणखी 5 मिनिटे शिजवा.

  • यानंतर गॅस बंद करा. साबुदाण्याची खीर तयार आहे.

साबुदाणी खीर खाण्याचे फायदे (Fayde)

  • साबुदाणा खीर खाल्ल्यास पचन सुरळितपणे कार्य करते.

  • अशक्तपणा कमी करण्यासाठी साबुदाणा खीर खाण्याचा सल्ला दिला जातो.

  • स्नायु मजबुत करण्यासाठी मदत करते.

  • हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्याचे असेल तर साबुदाणा खीरचे सेवन करू शकता

Mahashivratri 2024 Special Upwas Recipe | Sabudana Kheer Recipe in Marathi
Solkadhi Recipe: अशी बनवा अस्सल गोवन पद्धतीची सोलकढी ...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com