देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. या दिवशी महादेवाची मनोभावे पुजा केल्यास सर्व इच्छा पुर्ण होतात. या दिवशी अनेक लोक विविध मंदिरात जावून महादेवाला प्रिय असलेले बेलाचे फुल आणि फळ अर्पण करतात. यंदा महाशइवरात्री 8 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही आसाममधील पुढील मंदिराला भेट देऊ शकता. येथे भेट देऊन तुमचं मन नक्की प्रसन्न होईल.
कुठे आहे हे मंदिर
आसाममध्ये वसलेले हे मंदिर महामृत्युंजय मंदिर म्हणून ओळखले जाते. हे जगातील सर्वात मोठे शिवलिंग आहे. त्याची उंची 126 फूट आहे. ते काळ्या दगडांनी बनलेले आहे. मंदिराचे बांधकाम 2021 मध्ये पूर्ण झाले.
हे मंदिर आसाममधील नागाव येथे वसलेले आहे. हे गुवाहाटीपासून सुमारे 120 किमी अंतरावर आहे. 2021 मध्ये मंदिरात छोटीशी दरड पडली होती. 28 एप्रिल 2021 रोजी आसाम आणि ईशान्य भागात मोठा भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता 6.7 एवढी होती. मात्र, भूकंपामुळे मंदिराचे फारसे नुकसान झाले नाही.
कसे पोहोचाल
हे विशाल शिवमंदिर नागाव शहरापासून 12 किमी अंतरावर आहे. त्यामुळे नागाव शहरातून भाड्याने टॅक्सी करून मंदिरात जावू शकता. तसेच तुम्ही शेअरिंग ऑटो देखील करू शकता.
जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर तुम्ही रंगपारा नॉर्थ जंक्शन पर्यंत ट्रेन पकडू शकता. येथून नागावचे अंतर 2 तासांचे आहे.
स्लीपर कोचमध्ये 500 ते 700 रुपयांमध्ये तिकीट आहे.
3AC कोचमधील तिकिटाची किंमत 1500 ते 2000 रुपयांपर्यंत आहे.
रंगपारा येथे पोहोचल्यानंतर तुम्ही थेट मंदिरापर्यंत कॅब देखील करू शकता..
या ठिकाणींनाही द्या भेट
तुम्ही आसाममध्ये मंदिरांना भेट देण्यासाठी जात असाल, तर तुम्ही इतर अनेक ठिकाणी फिरण्याचा आनंद घेऊ शकता. येथे चंपावती कुंडा धबधबा, बोर्डोवा तोरणा आणि सिलघाटला जावून प्रवास अविस्मरणीय बनवू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.