हिंदू धर्मात भगवान शिव हे त्रिमूर्ती मानले जातात. भगवान भोलेनाथ त्यांच्या नावाप्रमाणेच अतिशय निष्पाप आहेत. त्यांना खूप लवकर प्रसन्न करता येते. भोलेबनाथ भक्त शिवलिंगावर जल अर्पण करून मनोकामना पूर्ण करू शकतात. त्यांना बेलपात्र खूप आवडते. म्हणूनच त्यांच्या पूजेमध्ये बेलपत्र असणे खूप महत्वाचे आहे. परंतु भगवान शंकराला जितके साधे आणि निष्पाप आहेत तितकेच रूद्र स्वरूप धारण करतात.
महादेवाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगाची पूजा करताना अनेक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या घरात शिवलिंग असेल तर पूजा करताना कोणतीही चूक करू नका. त्यांची पूजा करताना काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. शिवलिंगाची मनोभावे पूजा केल्याने सुख आणि समृद्धी प्राप्त होते.
घरात शिवलिंग ठेवू नका
जर तुम्ही घरात शिवलिंगाची स्थापना करत असाल तर लक्षात ठेवा की शिवलिंग तुमच्या एका बोटाच्या आकाराचे असावे. फार मोठे शिवलिंग ठेवू नका. यामुळे भगवान शिव क्रोधित होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल तर ती नियमित करावी.
शिवलिंगाला उडीद डाळ अर्पण करा
जर तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल तर शनिवारी पूजा करताना शिवलिंगावर उडीद डाळ अर्पण करावी. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील दोष दूर होऊ शकतात.
गोकर्णा फुल
भोलेनाथाची मनोभावे पुजा केल्यास सर्व इच्छा पुर्ण होतात. तुम्ही रोज शिवलिंगाची पुजा करत असाल करत असाल तर गोकर्णा फुल अर्पण करावे. यामुळे आर्थिक समस्या दूर होते.
धोतऱ्याचे फळ आणि फुल
महादेवाला धोतऱ्याचे फळ आणि फुल अर्पण करणे शुभ मानले जाते.
तुळस अर्पण करू नका
शिवलिंगावर चुकूनही तुळशीचे पानं अर्पण करू नका. यामुळे भगवान शिव क्रोधित होऊ शकतात. त्यामुळे असे करणे टाळावे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.