यंदा महाशिवरात्री 8 मार्च 2024 रोजी साजरी होत आहे. महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथ यांची मनोबावे पुजा केल्यास अनेक समस्या दूर होतात.या दिवशी महादेवाला बेलाचे पान, फळं पांढरे फुल अर्पण करावे.
जर तुम्हाला भगवान शंकरांच्या व्यक्तिमत्त्वातील काही गुण अंगीकारले तर एक कुशल योद्धा बनु शकता आणि आयुष्यात येणाऱ्या समस्या दूर करू शकता.
एकाग्रता
भगवान शिव हे या विश्वातील सर्वश्रेष्ठ योगी मानले जातात. प्रत्येक परिस्थितीत स्वतःवर नियंत्रण ठेवणे सोपे नाही. परंतु महादेव जेव्हा जेव्हा ध्यानात बसतात तेव्हा जग इकडून तिकडे गेले तरी कोणीही त्यांच्या ध्यानात अडथळा आणू शकत नाही.
बाह्य सौंदर्यावर जावू नये
महादेवाचे पूर्ण रूप पाहिल्यावर हे स्पष्ट होते की ज्या गोष्टी लोकांना स्वतःच्या जवळही पहायच्या नाहीत त्या भगवान शिवाने अगदी सहज अंगीकारल्या आहेत. गळ्यात सर्पांची माळ, अंगाला भस्म, सोबत नंदी असा त्यांचा उल्लेख केला जातो.पण यातून हा संदेश मिळतो की दिसण्यात कसेही असले तरी तुमचा स्वभाव चांगला असाल पाहिजे.
प्राथमिकता समजून घ्या
महादेवाच्या गुणांपैकी एक म्हणजे त्यांचे प्राधान्यक्रम समजून घेणे आणि त्यानुसार कार्य करणे. महादेव आपल्या कुटुंबाला प्राधान्य देतात आणि आपल्या जीवनात देव आणि भक्तांनाही महत्त्व देतात.
नकारात्मकतेमध्ये सकारात्मकता
महादेवाचा एक गुण म्हणजे नकारात्मकतेत राहूनही सकारात्मक राहणे. समुद्रमंथनातून विष बाहेर आल्यावर सर्वजण मागे सरले पण महादेवाने स्वतः विष प्यायले. त्यांच्या या गुणामुळे जीवनात नकारात्मकता येते, पण त्यातून जात असताना सकारात्मक राहायला हवे.
मोकळेपणाने जीवन जगणे
महादेवाची जीवनशैली किंवा त्यांचे अवतार ते पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने जगले. कधी तांडव करताना ते नटराज झाले, कधी विष पिणारे नीलकंठ झाले, माता पार्वतीला शोषून अर्धनारीश्वर झाले तर कधी प्रथम आनंदी झालेला भोलेनाथ झाले. तुमचे आयुष्य मोकळेपणाने जगा, प्रत्येक भावना योग्य वेळी व्यक्त करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.