देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. हा विशेष दिवस भोलेनाथला समर्पित आहे. त्यामुळे लोक भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी विविध गोष्टी करतात. अनेक लोक महाशिवरात्रीला दिवसभर उपवास करतात, अनवाणी मंदिरात जातात, भगवान शंकराला बेलची पाने आणि फुल अर्पण करतात.
महाशिवरात्रीला भारतातील जवळजवळ प्रत्येकजण शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी मंदिरात जातो. कारण महाशिवरात्रीला शिवलिंगाला विशेष महत्त्व आहे, या दिवशी भोलेनाथांनी पहिल्यांदा शिवलिंगाचा अवतार घेतला होता. तुम्हालाही भोलेनाथाला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही घरातील अंगणात शिवलिंगाची रांगोळी बनवू शकता.
तांदळाचा वापर
पांढऱ्या रंगाच्या शिवलिंगाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त मंदिरासमोरील तांदळाची रांगोळी तुम्ही घराच्या अंगणात काढू शकता. असे मानले जाते की जो कोणी शुभ्र शिवलिंगाचे दर्शन घेतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे अशा प्रकारची रांगोळी डिझाइन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
शिवलिंगाची गोलाकार रचना करण्यासाठी तुम्ही गोल झाकण वापरू शकता.
सर्वात पहिले झाकणापासून गोल डिझाइन करा आणि स्केलच्या मदतीने तळाशी एक रेषा काढा.
शिवलिंगावर डोळ्याची रचना करण्यासाठी तुम्ही फक्त निळ्या रंगाचा वापर करू शकता.
फुलांचा वापर
जर तुमच्याकडे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ नसेल आणि तुम्हाला रांगोळी कशी काढायची हे माहित नसेल तर तुम्ही फुलांनी शिवलिंगाची रांगोळी तयार करू शकता. फुलांच्या साहाय्याने रांगोळी काढणे खूप सोपे आहे. तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी रांगोळी डिझाइन करू शकता
महाशिवरात्रीला बेलाच्या पानाची डिझाइन काढू शकता. बेलाचे पान महादेवाला प्रिय आहे. घरातील अंगणात बेलाचे तीन पान काढू शकता. त्यात शिवलिंग देखील काढू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.