Lunch Box Idea: अनेक महिलांना मुलांना लंचसाठी डब्ब्यात काय द्यावे हा प्रश्न पडतो. कारण काही मुलं चांगली डिश न दिल्यास उपाशी राहतात. अशा मुलांसाठी जेवणाचे डब्बे तयार करणे अवघड होते. पण तुम्ही पुढील पदार्थ बनवून लहान मुलांना खायला देऊ शकता. जे बनवायला देखील सोपे आणि हेल्दी आहेत.
मिनी इडली
रव्यामध्ये दही आणि पाणी घालून चांगले मिक्स करा आणि मीठ घालावे. थोडा वेळ तसेच राहू द्या. यानंतर ठेवलेल्या रव्याच्या इडलीच्या पिठात इनो घालून फेटून घ्यावे. इडली साचामध्ये आता त्यात रवा पीठ घालून झाकण ठेवून गॅसवर ठेवावे. १५ मिनिटानंतर बाहेर काढावे. मिनी इडल्या तयार आहेत. नारळाची चटणीसोबत आस्वाद घ्यावा.
बेसण चिला
बेसनाच्या पिठात हळद, मीठ, जिरं, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, सिमला मिरची घालावी. तुम्ही टोमॅटो देखील घालू शकता. यानंतर पाणी घालून चांगले मिसळा आणि हलके जाडसर पिठ तयार करा. गरम तव्यावर तेलाचे काही थेंब शिंपडा. आता पीठ एका छोट्या चमच्याने तव्यावर ओतावे. एका वेळी चार ते पाच चीले तयार करता येतात. झाकण ठेवून शिजू द्या. नंतर वळून दोन्ही बाजूंनी शिजवा. लंच बॉक्समध्ये सॉससह मुलांना देऊ शकता. हा पदार्थ चवदार आणि आरोग्यदायी आहे.
उपमा
रव्यात दही आणि मीठ घालून चांगले फेटून घ्या. लोखंडी तव्यावर किंवा नॉनस्टिक तव्यावर तेल टाकावे. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची घाला. भाज्या हलक्या भाजून घ्याव्या. आता शिजण्यासाठी झाकण ठेवा. काही वेळाने झाकण काढून उत्तपम फिरवावे. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी शिजल्यावर उत्तपम तयार होतो. नारळाच्या चटणीसोबत डब्यात पॅक करून देऊ शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.