यंदा वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर होणार आहे. चंद्रग्रहण सर्व राशींवर परिणाम करू शकते. त्याचा प्रभाव काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असू शकतो. ग्रहणानुसार चंद्र ग्रहणाच्या वेळी मेष राशीत असेल. गुरु इथे आधीच उपस्थित आहेत. गुरू आणि चंद्र मिळून मेष राशीत गजकेसरी योग तयार करतील. या योगाचा काही राशींवर खूप शुभ प्रभाव पडणार आहे. यामुळे कोणत्या राशींचे भाग्य चमकणार आहे हे जाणून घेऊया.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण खूप शुभ राहणार आहे. यामुळे चंद्र राशीच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होतील. पण विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. प्रत्येक कामात यश आल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन
दिवाळीच्या आधी होणारे वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हा दिवस चांगला असणार आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. आपल्या करिअरमध्ये परदेशात शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणारे लोक यशस्वी होतील. हे जाणून घेतल्यासच तुम्हाला मानसिक आणि आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल. या लोकांना जीवनात यश नक्की मिळेल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण एखाद्या राजयोगापेक्षा कमी नाही. चंद्रग्रहणानंतर कन्या राशीच्या लोकांचे दिवस बदलणार आहे. त्यांना कामात यश मिळणार आहे. तसेच संकट आणि कर्जापासून मुक्ती मिळणार आहे. प्रत्येत कामात यश मिळाल्याने परदेशात जाण्याची शक्यता आहे.
कर्क
शरद पौर्णिमेला होणारे चंद्रग्रहण कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक मोठे बदल घडवून आणणार आहे. या राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. नोकरीपासून व्यवसायात या लोकांना यश मिळणार आहे. लग्नाची तयारी करणाऱ्या लोकांना चांगला जोडीदार मिळेल. आर्थिक स्थितीत मोठा बदल होईल. जीवनात शांतता जाणवेल.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.