Liver Health Tips: लिव्हर ठेवा सुरक्षित; फॉलो करा 'या' टिप्स

यकृताचे आरोग्य राखण्यासाठी आहाराची भूमिका महत्त्वाची असते
Liver Health Tips
Liver Health TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Liver Health Tips: यकृत हा शरीराचा एक आवश्यक अवयव आहे, जो शरीरातील अनेक कार्यांसाठी जबाबदार आहे. पित्तरस तयार करणे, रक्त शुद्ध करणे, चांगले पचन आणि जीवनसत्त्वे साठवण्यापर्यंत हा अवयव मल्टीटास्कर आहे. यकृताचे महत्त्व जाणून, ते त्याच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करत आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.

यकृताचे आरोग्य राखण्यासाठी आहाराची भूमिका महत्त्वाची असते. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि यकृत-स्वच्छ आहाराचा अवलंब करणे ही आजारांपासून दूर राहण्याची उत्तम रणनीती आहे.

नैसर्गिकरित्या यकृताचे आरोग्य सुधारण्याचे 7 मार्ग

  • एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून ते पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा.

  • दररोज किमान 6-8 ग्लास पाणी प्या. आणि, शिवाय, 2-3 ग्लास गरम पाणीदेखील प्या. या पाण्याच्या सेवनाने यकृत आणि किडनी तर स्वच्छ होतीलच पण वजन कमी करण्यासही मदत होईल.

  • ताज्या भाज्यांचे रस तुमच्या यकृतासाठी चमत्कार करू शकतात. एक ग्लास गाजर, बीटरूट आणि पालकाचा ज्यूस प्या किंवा तुम्ही एक ग्लास व्हीटग्रास ज्यूस देखील घेऊ शकता, हे दोन्ही यकृत शुद्ध करण्यासाठी महत्वाचे आहेत.

  • आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुमच्या आहारात किमान 40% फळे आणि भाज्यांचा समावेश असावा. याचे कारण असे आहे की यामध्ये भरपूर एन्झाइम असतात, जे पचनास मदत करतात आणि यकृतात जमा झालेले घातक पदार्थ काढून टाकतात.

  • यकृताचे आरोग्य राखण्यासाठी साखर आणि मैदा टाळा. दोन्ही घटक यकृताला घातक आहेत. ज्यामुळे बॅक्टेरियांची वाढ होते.

  • मूग, मटकी, काळे चणे, हिरवे चणे आणि अंकुरलेले गहू यांसारख्या अंकुरलेल्या कडधान्यांचे सेवन करा कारण ते यकृताच्या शुद्धीकरणाचे गुणधर्म वाढवतात.

  • दूध, मटण, चिकनची त्वचा, प्रक्रिया केलेले आणि तळलेले पदार्थ यामध्ये असलेले सॅच्युरेटेड फॅट्स टाळा. याचे नियमितपणे आणि मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास चरबी तुमच्या यकृतावर वाईट परिणाम होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com