
cardamom benefits
Dainik gomantak
वेलचीचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या प्रकारे करतो. कधी याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो तर कधी चहामध्ये वेलचीच्या सुगंधाने तोंडाची चव बदलण्यासाठी वापरला जातो. वेलची हा भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा मसाला आहे, जो प्रत्येक घरात वापरला जातो. वेलचीमध्ये असलेले गुणधर्म शरीराला अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात.
वेलचीमध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म देखील असतात. मेडिकल (Medical) न्यूज टुडेच्या रिपोर्टमध्ये छोट्या संशोधनाचा अहवाल देत वेलचीचे शरीरासाठी फायदे सांगितले आहेत.
वेलची खाण्याचे फायदे
1. अँटी-मायक्रोबियल क्षमता – वेलचीमध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आढळतात. एका अभ्यासानुसार, वेलचीच्या तेलामध्ये विविध प्रकारचे बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संक्रमण दूर करण्याचा गुणधर्म देखील आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत वेलचीच्या तेलाचे सेवन न करण्याच्या सूचनाही संशोधकांनी दिल्या आहेत.
2. मेटाबॉलिक सिंड्रोम - काही अभ्यासानुसार, वेलची देखील मेटाबॉलिक सिंड्रोम बरा करण्यासाठी उपयुक्त आहे. मेटाबॉलिक सिंड्रोम हा खरं तर आरोग्य परिस्थितींचा एक समूह आहे ज्यामध्ये हृदयरोग आणि मधुमेह देखील येतो. या अंतर्गत लठ्ठपणा, उच्च साखर, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल या या आजारांवर देखील मात करते.
3. हृदयाचे आरोग्य जपते - काही संशोधनातून (Research) असे दिसून आले आहे की हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी वेलची प्रभावी ठरते. उंदरांवर केलेल्या संशोधनानुसार वेलची हृदयविकाराचा झटका रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट क्रियाकलापांमुळे आरोग्य कार्य सुधारण्यास मदत होते.
4. ओरल हेल्थ (Health) - वेलचीचा माउथ फ्रेशनर म्हणून वापर करताना आपण सर्वांनी अनेकदा पाहिले असेल. शतकानुशतके ते माउथ फ्रेशनर म्हणून वापरले जात आहे. वेलचीच्या सेवनाने तोंडात वाढणारे बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते.
5. यकृताचे आरोग्य जपते – वेलचीचा वापर अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही केला जातो. वेलचीच्या सेवनाने आपल्या यकृताला चांगले काम करण्यास मदत होते, जी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.