Leg Palmistry: गुळगुळीत तळवे अन् बोटांचा आकार... पायाची 'अशी' रचना असलेले लोक असतात भाग्यवान

ज्योतिषशास्त्रात पायांचा आकार, रंग तसेच खुणा पाहून भविष्य सांगितले जाते.
Leg Palmistry
Leg PalmistryDainik Gomantak

Leg Palmistry: लोक हातावरील रेषांना अधिक महत्त्व देतात. पण तुम्हाला माहिती आहे का पायाचा आकार, रंग आणि खुणा पाहून देखील व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे भविष्य जाणून घेता येते. अशाच काही खास खुणा आणि पायाच्या आकाराविषयी असलेल्या गोष्टी जाणून घेऊया.

  • महिलांच्या पायाचा तळवे

ज्या महिलांच्या पायाचे तळवे चालताना जमिनीला चांगले स्पर्श करत नाही आणि त्यांचा रंग गुलाबी असतो, अशा पायांच्या महिला धनवान असतात. अशा महिलांना आयुष्यात कशाचीही कमतरता जाणवत नाही. अशा मुलीशी लग्न करणारा व्यक्ती लग्नानंतर राजासारखे आनंदी जीवन जगतो.

  • बोटांचा आकार

जर पायाची बोटे एकसारखी, उजवीकडे किंचित वाकलेली, मऊ, समोरून गोलाकार आणि दिसायला गुळगुळीत आणि चमकदार असल्यास अशी व्यक्ती खूप धनवान आणि भाग्यवान असतात.

  • पायांवरच्या खुणा

जर पायावर कमळ, पंखा, शंख, धनुष्य, रथ, भौंरा, सूर्य, चंद्र, गदा, मासे, बाण यासारख्या खुणा असतील तर असे लोक ज्योतिषशास्त्रानुसार खूप भाग्यवान असतात.

Leg Palmistry
Vastu Tips For Kids Photo: घरात लहान मुलांचे फोटो लावण्यापुर्वी वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं
  • पायांचे बोटं

ज्या लोकांच्या पायाचा अंगठा सपाट, फाटलेला, वाकडा, कोरडा किंवा अगदी लहान असेल तर हे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते.

  • टाचांचा आकार

ज्या लोकांचे टाच गोलाकार, मुलायम आणि सुंदर असेल तर अशा व्यक्तीचे जीवन सर्व प्रकारच्या ऐश्वर्य आणि सुखाने भरलेले असते. मोठे टाच असलेले पुरुष आणि स्त्रिय आनंदी आयुष्य जगतात.

Legs
Legs Dainik Gomantak
  • पुरूषांचे पाय

ज्या पुरूषांच्या पाय समोर खूप रुंद आणि मागच्या बाजूला खूप अरुंद असतात किंवा बोटांध्ये जास्त अंतर असेल तर अशुभ मानला जाते. अशा लोकांचे नशिबात अनेक समस्या असतात.

  • या गोष्टी मानल्या जातात अशुभ

पायाच्या तळव्यावर घाम येणे किंवा पायावर जास्त केस येणे ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ लक्षण मानले जाते. असे लोक भाग्यवान नसतात.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com