चार भिंतीपलीकडील शिक्षण गरजेचे

चार भिंतीपलीकडचा अनुभव मुलांसाठी आनंदाचा असतोच पण त्याशिवाय तो त्यांच्या ज्ञानाची कवाडे वेगळ्यातऱ्हेने खोलतो.
चार भिंतीपलीकडील शिक्षण गरजेचे
चार भिंतीपलीकडील शिक्षण गरजेचे Dainik Gomantak
Published on
Updated on

चार भिंतीपलीकडचा अनुभव मुलांसाठी आनंदाचा असतोच पण त्याशिवाय तो त्यांच्या ज्ञानाची कवाडे वेगळ्यातऱ्हेने खोलतो. स्वच्छ प्रकाशात आपल्या भोवतालच्या परिसराला समोरासमोर भेटण्यातली मौज विलक्षण असते. या आनंदाबद्दल आणि अशा आनंदाच्या महत्त्वाबद्दल ताल्लुला डिसिल्वा त्यांच्या ऑनलाइन (Online) व्याख्यानांमधून बोलणार आहेत.

ताल्लुला डिसिल्वा मातीची घरे आणि त्यांच्या शाश्‍वततेचे अनुभवसिद्ध महत्त्व लोकांना अलीकडच्या काळात समजावून सांगणाऱ्या स्थापत्यकार (आर्किटेक्‍ट) आहेत. त्याशिवाय मुलांबरोबर सातत्याने काम करणाऱ्या त्या पर्यावरणप्रेमीही आहेत. गेली दहा वर्षांपेक्षा अधिक काळ त्या लहान मुलांबरोबरच्या आउटडोर (Outdoor) उपक्रमात गुंतलेल्या आहेत. विद्यार्थी (Student) आणि युवकांसाठी त्या असे उपक्रम आयोजित करून निसर्ग, पर्यावरण, इतिहास अशा सामाजिक बाबीबद्दल त्यांना कृतीप्रवण करत असतात. या कोरोना (Corona) काळात त्यांनी अंगण आणि समुदाय वर्गाद्वारे परिसरातील मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी ‘लर्निंग बियोण्ड वर्च्युअल प्लॅटफॉर्म ऑफ ऑनलाईन क्लासेस’ हा उपक्रम राबवला होता.

चार भिंतीपलीकडील शिक्षण गरजेचे
प्रियोळ येथील ‘मिस्टिक वुड्स’ बनले पर्यटकांचे आकर्षण

चार भिंतीपलीकडचे शिक्षण – ‘टीचिंग स्टुडंट्स बियोण्ड फोर वॉल्स’ या विषयावरच्या त्यांच्या व्याख्यानातून ताल्लुला डिसिल्वा, मोकळ्या वातावरणातील शैक्षणिक उपक्रमांबद्दलच्या त्यांच्या अनुभवाबद्दल बोलतील. वर्तमानकाळात कोरोनामुळे (Corona) निर्माण झालेल्या आव्हानमय काळात अशा प्रकारचे शिक्षण (Education) का महत्वाचे आहे हा त्यांच्या बोलण्यातला महत्त्वाचा भाग असेल.

‘ढाई अखर गोवा’ या संस्थेने ताल्लुला डिसिल्वा यांचे हे व्याख्यान आयोजित केले आहे. कला(Art) , संस्कृती (Culture) , साहित्य (Literature) आणि पर्यावरणशास्त्र (Environment) या प्रांतात काम करणारी ही संस्था आहे. ताल्लुला डिसिल्वा यांच्या व्याख्यानासाठी ‘झूम’वर आपण सामील होऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com