Laxmi Pujan: दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. हा सण खुप उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मी-गणेशाची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात असे म्हटले जाते. यंदा दिवाळी 12 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. तुम्ही सर्व पूजा साहित्य अगोदरच खरेदी करणे गरजेचे आहे. जाणून घेऊया दिवाळी पूजेशी संबंधित कोणत्या खेदी करणे आवश्यक आहे.
लक्ष्मी पुजनाची योग्य वेळ
दिवाळीचा प्रदोष काल संध्याकाळी 05:29 ते रात्री 08:08 पर्यंत वृषभ काल संध्याकाळी 05:39 ते 07:35 पर्यंत आणि निशिता मुहूर्त रात्री 11:39 ते 12:32 पर्यंत असतो. दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा करणे शुभ मानले जाते.
दिवाळीत बंताशे वाटावे
दिवाळीत पूजा केल्यावर बताशांचे पाच भाग करावे लागतात. पहिला भाग गाईला, दुसरा भाग गरजू व्यक्तीला, तिसरा भाग पक्ष्यांना, चौथा भाग पिंपळाच्या झाडाखाली आणि पाचवा भाग घरातील लोकांना प्रसाद म्हणून द्यावा.
गणेश-माता लक्ष्मीची मूर्ती कशी असावी?
या सर्व गोष्टींसोबतच दिवाळीत माता लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती तुटणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागेल. मार्केटमध्ये खूप गर्दी असते. त्यामुळे माता लक्ष्मीची खरेदी करतांना काळजी घ्यावी. तुटलेली मूर्ती आणणे असुब मानले जाते.
दिवाळीच्या दिवशी संपुर्ण घरात पणत्या लावावे. असे केले जाते कारण दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेश भक्तांच्या घरी वास करतात.
या गोष्टी टाळाव्यात
दिवाळी दरम्यान मांसहार आणि मद्यपान करणे टाळावे.
मोठ्या लोकांशी वाद घालु नका.
घरात तुटलेल्या वस्तु ठेऊ नका.
घरातील कोणत्याही कोपऱ्यात कचरा ठेऊ नका.
दिवाळी दरम्यान धुम्रपान करणे टाळावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.