Laughing Buddha घरात कोणत्या दिशेला ठेवावे? जाणून घ्या फायदेशीर वास्तू सल्ला

जगाला हसत राहण्याचा संदेश देणारे भगवान बुद्धांचे तत्वज्ञान आजही लोकांना प्रेरित करते.
Laughing Buddha
Laughing Buddha Dainik Gomantak
Published on
Updated on

Laughing Buddha Tips: वास्तुशास्त्रानुसार, आपल्या घरात ठेवलेल्या वस्तूंचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट योग्य दिशेने ठेवणे आवश्यक आहे. वास्तूनुसार लाफिंग बुद्ध घरात ठेवल्याने सुख-समृद्धी राहते. त्यामुळे घरातही आनंदाचे वातावरण असते. जाणून घेवूया लाफिंग बुद्धा घरात ठेवण्याचे फायदे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी.

लाफिंग बुद्ध कोण आहे?

बौद्ध धर्माविषयी अनेक प्रसंग आहेत, त्यापैकी लाफिंग बुद्ध अलिकडे खूप लोकप्रिय आहे. होतेई नावाच्या व्यक्तीने जपानमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यांनी खूप तपश्चर्या केली होती, ज्यातून त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्ती झाल्यावर होतेई जोरात हसायला लागले. लोकांना हसवणं हेच त्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय बनवल्याचं म्हटलं जातं. त्यांनी अनेक देशांचा प्रवास केला आणि ते जिथे गेले तिथे लोकांना खूप हसवले. तेव्हापासून त्याचे नाव लाफिंग बुद्ध, म्हणजे - हसणारे भगवान बुद्ध असे पडले.

Laughing Buddha
Feng Shui: फेंगशुईचे 'हे' 3 उपाय करतील धनाची कमतरती दूर

लाफिंग बुद्धाच्या मूर्तीचे महत्त्व

लाफिंग बुद्धाला आनंदाचे प्रतीक मानले जाते. जगाला हसत राहण्याचा संदेश देणारे भगवान बुद्धांचे तत्वज्ञान आजही लोकांना प्रेरित करते. त्यामुळे लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने घरात आनंद येतो, असे मानले जाते. घरात सुख-समृद्धी नांदते. घरातील नकारात्मक प्रभाव संपतो आणि प्रत्येकजण आनंदाने जगायला लागतो.

Laughing Buddha
Leftover Roti: उरलेल्या चपात्यांपासून बनवा स्वादिष्ट ब्रेकफास्ट

लाफिंग बुद्ध घरात कुठे असावा?

लाफिंग बुद्धा घरात ठेवण्याचेही नियम आहेत. वास्तूनुसार लाफिंग बुद्धाची मूर्ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवली पाहिजे, परंतु त्याची उंची किमान 30 इंच असावी. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. याशिवाय स्टडी रूममध्ये लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवता येते. त्यामुळे मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढेल. लाफिंग बुद्ध कधीही किचन, डायनिंग एरिया, बेडरूम, टॉयलेट किंवा बाथरूममध्ये आणि जमिनीवर ठेवू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com