गर्भपाताची नेमकी लक्षणे काय आहेत? जाणून घ्या

NHS च्या अहवालानुसार, गर्भपाताची समस्या अतिशय सामान्य आहे. आठपैकी एक गर्भवती महिला गर्भपाताने ग्रस्त आहे.
Women Pregnancy
Women PregnancyDainik Gomantak
Published on
Updated on

प्रेग्नेंसीमध्ये 24 आठवड्यांच्या आत गर्भामध्ये वाढत असणारा नष्ट झाल्यास वैद्यकीय भाषेत गर्भपात असे म्हणतात. अशी परिस्थिती माता-पित्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी काही नसते. गर्भपाताबद्दल काही गोष्टी समजून घेणे खूप महत्वाचे आहे. जसे, त्याची लक्षणे काय आहेत? किंवा स्त्रीया समस्यांना सामोऱ्या जातात?

गर्भपात म्हणजे गर्भधारणेच्या पहिल्या तीन ते चार महिन्यांत गर्भाचा नाश होणे. गर्भपाताची अनेक कारणे असू शकतात, परंतु यासाठी आईला चुकीचे किंवा जबाबदार धरणे योग्य नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये, आईला गर्भपाताचे कारण देखील माहित नसते, ज्यामुळे ही घटना अधिक भयावह बनते.

गर्भपात सामान्यतः गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत न जन्मलेल्या बाळाच्या समस्येचा परिणाम असतो. नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) च्या मते, गर्भातील असामान्य गुणसूत्र यासाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. खरं तर, गर्भात खूप कमी किंवा खूप गुणसूत्रांमुळे गर्भपात होतो. या स्थितीत, विकसनशील गर्भ पूर्णपणे विकसित करण्यास सक्षम नाही.

Women Pregnancy
कान टोचतायं? थांबा, आधी ही बातमी वाचा

सुमारे दोन ते पाच टक्के गर्भपात होण्यासाठी आनुवंशिकता जबाबदार आहे. कधीकधी लोकांना जोडीदाराच्या असामान्य गुणसूत्रांची माहितीही नसते. यामुळे प्लेसेंटाच्या विकासास समस्या निर्माण होऊ शकतात. गर्भामध्ये रक्ताचा आणि पोषक तत्वांचा अभाव असू शकतो. जर गर्भधारणेच्या तीन महिन्यांनंतर गर्भपात झाला, तर तो कमकुवत गर्भाशय, कोणताही संसर्ग किंवा लैंगिक संसर्गजन्य रोग, गर्भाशयाचा आकार, पीसीओएस किंवा अन्न विषबाधा यामुळे होऊ शकतो.

तज्ञांच्या मतानुसार, वारंवार गर्भपात किंवा विलंबाने गर्भपात होण्याची अनेक कारणे असू शकतात. रक्ताच्या गुठळ्या होण्याचे विकार, थायरॉईड समस्या, गर्भाशय ग्रीवा किंवा आपल्या रोगप्रतिकारक पेशींमधील कमजोरी देखील प्रजननक्षमतेवर परिणाम करु शकते. गर्भपाताला बळी पडलेल्या अनेक महिलांना भविष्यात माता होण्याचा बहुमान मिळतो. परंतु जर एखाद्या महिलेला वारंवार किंवा बराच काळानंतर गर्भपाताची समस्या येत असेल तर ती निश्चितपणे तपासली पाहिजे.

45 वर्षांनंतर आणखी समस्या

NHS च्या अहवालानुसार, गर्भपाताची समस्या अतिशय सामान्य आहे. आठपैकी एक गर्भवती महिला गर्भपाताने ग्रस्त आहे. आपण गर्भवती आहोत हे माहीत असण्यापूर्वीच अनेक स्त्रियांचा गर्भपात होतो. तथापि, 100 पैकी फक्त एका महिलेला वारंवार गर्भपात होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते (तीन किंवा अधिक वेळा). वाढत्या वयाच्या स्त्रियांमध्ये गर्भपाताची समस्या अधिक दिसून येते. 30 वर्षांखालील 10 पैकी एका महिलेचा गर्भपात होतो. तर 45 वर्षांवरील 10 पैकी पाच महिला याच्या बळी आहेत.

Women Pregnancy
Aluminum Foilमध्ये अन्न देताय, थांबा आधी ही बातमी वाचा

गर्भपाताची लक्षणे काय आहेत?

रक्तस्त्राव किंवा कपड्यांवर रक्ताचे हलके किंवा जड ठसे हे गर्भपात होण्याचे लक्षण असू शकते. परंतु हे देखील लक्षात ठेवा की, गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत रक्तस्त्राव किंवा रक्ताचे डाग सामान्य आहेत. फक्त गर्भपात म्हणून घेणे योग्य नाही. असे झाल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. या व्यतिरिक्त, ओटीपोटाच्या खालच्या भागात वेदना किंवा पेटके जाणवणे, खाजगी भागातून द्रव बाहेर पडणे किंवा ऊतींचे स्त्राव होणे ही देखील गर्भपाताची लक्षणे आहेत. दीर्घकाळापर्यंत गर्भधारणेची लक्षणे न जाणवणे ही देखील एक चेतावणी असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com