Kitchen Hacks: उरलेल्या चहापावडरचा असा करा घरगुती कामांसाठी वापर

आपण अनेक वेळा वापरलेली चहा पावडर फेकून देतो. पण तुम्ही या चहा पावडरचा वापर काही घरगुती कामासांठी करू शकता.
Kitchen Hacks
Kitchen HacksDainik Gomantak
Published on
Updated on

Kitchen Hacks: अनेक लोकांची दिवसाची सुरूवात ही चहाने होते. भारतात चहा हे आवडते पेय आहे. आपल्यापैकी अनेक जण चहा गाळल्यानंतर चहा पावडर फेकून देतात. जर तुम्हाला त्याचे फायदे माहित असतील तर तुम्ही चहा वापडर फेकून देणार नाही. आजकाल प्रत्येकजण टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करतात. चला तर मग जाणून घेऊया उरलेल्या चहा पावडरचा वापर कसा करावा.

  • भांडी स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर

उरलेल्या चहा पावडरचा तुम्ही खाण्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी करू शकता. उरलेली चहा पावडर एका पॅनमध्ये पाण्यात टाकून उकळावे. नंतर या पाण्याने भांडी धुतल्यास तेलकटपणा आणि डाग कमी करतात.

  • त्वचेवरचा टॅन कमी होतो

चहा पावडर त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. चेहऱ्यावर टॅन आल्यास उरलेल्या चहा पावडरमध्ये बेकिंग सोडा आणि पाणी मिक्स करून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट तुम्ही घुडगे,कोपरा आणि मानेवर लावु शकता. यामुळे टॅन कमी होते.

  • फर्निचरची चमक टिकून राहते

अनेक वेळा जुन्या फर्निचरची चमक कमी होते. अशा वेळी उरलेल्या चहाच्या पावडरचा पाणी स्प्रे बॉटलमध्ये मिक्स करून फर्निचरवर शिंपडल्यास ते नवीनसारखे चमकते.

  • झाडांसाठी खत म्हणून वापर

तुम्ही उरलेली चहाची पावडर खत म्हणून वापरू शकता. चहा वापडर झाडांच्या मुळात टाकल्यास झाडांची झपाट्याने वाढ होते.

Kitchen Hacks
Raw Onion Benefits: कच्चा कांदा खाल्ल्याने अनेक आजारांपासून मिळू शकते मुक्ती
  • जखम बरी होते

चहाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे जखम भरण्यास मदत होते. उरलेली चहा पावडर गरम पाण्यात उकळावी. नंतर दुखापत झालेल्या भागावर लावा आणि नंतर धुवावी.यामुळे जखम लवकर बरी होते.

  • घरातील माश्या जातात

अनेक घरांमध्ये माशा खुप असतात. माशांमुळे अन्न दूषित होते. ज्यामुळे अनेक रोग पसरतात. त्यांना दूर करण्यासाठी उरलेली चहा पावडर सुती कपड्यात गुंडाळावी आणि स्वयंपाकघरात ठेवावी. असे केल्याने घरात माशा येत नाही.

  • केसांसाठी फायदेशीर

निरुपयोगी समजली जाणारी चहाची पावडर केसांसाठी फायदेशीर ठरू शकते. चहा पावडर उकळल्यानंतर पाणी थंड करा आणि नंतर तुम्ही ते कंडिशनर म्हणून वापरू शकता. असे केल्याने केस चमकदार होतात. तसेच मेहंदी लावताना उरलेल्या चहा पावडरचे पाणी वापरल्यास केस सिल्की होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com