Kitchen Hacks: काचेचे कप अन् ग्लासेस वर्षानुवर्षे टिकून ठेवण्यासाठी वापरा हे हॅक्स

Kitchen Hacks: काचेचे कप आणि वाट्या अतिशय नाजूक असतात आणि छोड्याशा चुकूमुळे ते तुटू शकतात. पण काही सिंपल टिप्स वापरून तुम्ही वर्षानुवर्षे सहज टिकवून ठेऊ शकता.
Kitchen Hacks:
Kitchen Hacks: Dainik Gomantak
Published on
Updated on

kitchen hacks keep glass or bowl long for a year read tips

आजकाल माडर्न कल्चर घर आणि स्वयंपाकघरापासून लाइफस्टाइलपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये खूप बदल झाले आहेत. स्वयंपाकघरात वापरण्यात येणारी जवळपास सर्वच भांडी आता काचेची आहेत.

ती स्टोअर करताना आणि वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे. यापैकी एक म्हणजे काचेचे कप आणि ग्लास आहे. हे अतिशय नाजूक असतात. त्यामुळे ते दीर्घकाळ टिकवून ठेवणे फार कठीण आहे. पण तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही काही टिप्स वापरून ते वर्षानुवर्षे वापरू शकता.

बॉक्साचा वापर

काचेचे ग्लास आणि वाट्या सुरक्षित ठेवण्यासाठी एका चांगल्या बॉक्समध्ये ठेवावे. यामुळे ते तुटण्याची शक्यता कमी असते.

कपाटाचा वापर करावा

काचेचे कप आणि ग्लास वर्षानुवर्षे टिकण्यासाठी त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. ते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही या वाट्या कपाटात ठेवू शकता. कपाटात नीट ठेवावे. काचेचा कप किंवा वाटी मोकळ्या जागी ठेवल्यास तो चुकून कधीही पडून तुटतो. त्यामुळे यासाठी खास कपाट ठेवा आणि त्यात काचेची भांडी ठेवा.

भांडे ठेवण्याचे स्टँड

जर तुम्हाला काचेचे कप आणि वाट्या जास्त दिवस सुरक्षित ठेवायचे असतील, तर तुमच्याकडे भांडे ठेवण्याचे स्टँड असणे आवश्यक आहे. यासाठी चांगले स्टँड असणे गरजेचे आहे. स्टँड असा असावा की भांडे सहज पडणार नाही. काचेचे भांडे सुरक्षित आणि वर्षानुवर्षे टिकून राहण्यासाठी, तुम्ही ते स्टँडमध्ये व्यवस्थित ॲडजस्ट करणे गरजेचे असते.

उंच जागेवर ठेवावे

काचेची भांडी खाली ठेवणे टाळावे. कारण, आपल्याला स्वयंपाकघरात एकाच वेळी अनेक कामे करावी लागतात. तुमचा हात चुकून काचेला किंवा वाटीला लागल्यास ते फुटू शकते. त्यामुळे स्वयंपाकघरातील वरच्या रॅकवर काचेची भांडी ठेवावी. याटिप्समुळे तुमची काचेची भांडी दीर्घकाळ टिकू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Corruption In Indian Politics
Goa Smart Meter Controversy
Morjim Beach Glass Waste
Goa Crime
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com