तुमच्या घरात उरलेल्या सायचे तुम्ही काय करता? अनेक घरांमध्ये साय एकतर त्यात साखर घालून खाल्ले जाते किंवा ते काही विविध पादर्थांमध्ये वापरले जाते.
जर घरी जास्त प्रमाणात साय जमा झाली असेल तर तूप तयार केले जाते. अनेक लोक घरी तूप तयार करण्यासाठी पुरेशी साय जमा करतात. परंतु तरीही ते बनवत नाहीत. याचे साधे कारण असे की अनेक लोक घरी तूप बनवण्याची प्रक्रिया अतिशय किचकट आहे असे मानतात. अनेक तास साय शिजवल्यानंतर तुप तयार होते.
झटपट तुप कसे तयार कराल
कोणत्याही त्रासाशिवाय सायपासून तूप काढू शकता. यासाठी सर्वात पहिले साय कुकरमध्ये ठेवा. यानंतर त्यात थोडे पाणी घाला.
यानंतर गॅसवर ठेवा जेणेकरून ते थोडे वितळेल आणि नंतर कुकरचे झाकण बंद करा आणि एक शिट्टी होईपर्यंत शिजवा.
दाब आल्यावर सायमधून तूप आपोआप बाहेर पडते.
यानंतर झाकण उघडून गॅसवर ठेवा आणि त्यात थोडासा बेकिंग सोडा घाला. बेकिंग सोडा जास्त वापरल्यास तुपाची चव खराब होऊ शकते हे लक्षात ठेवा.
तुमच्या लक्षात येईल की 5-7 मिनिटांत तूप अगदी सहज बाहेर पडू लागते.
सँडविच
अनेक लोकांना मेयोनीज खायला आवडत नाही. मेयोनीज अंड्यापासून तयार होत तर वीगन मेयोनीजची चव अनेक लोकांना आवडत नाही. पण तुम्ही साय लावून ब्रेड खाऊ शकता.यासाठी ३ चमचे साय दोन चमचे पीनट बटरमद्ये मिक्स करा. यात चिली फ्लेक्स टाकून आस्वाद घेऊ शकता.
सायीचा लाडू
सायीचे लाडू तुम्ही पहिल्यांदाच ऐकले असेल. हा एक अतिशय चवदार पदार्थ आहे ज्याचा तुम्ही जेवणानंतर आनंद घेऊ शकता. सायीचा लाडू हा अतिशय झटपट तयार होणारा पदार्थ आहे.
यासाठी सर्वात पहिले कढईत 1.5 कप किसलेले खोबरे 1 चमचा तुपासह घेऊन कढईत तळून घ्या. खोबरे तपकिरी होईपर्यंत भाजावे.
यानंतर, ते एका प्लेटमध्ये काढा आणि त्यात 1/2 कप चिरलेले बदाम आणि 1/2 कप चिरलेले काजू घाला.
जर तुम्ही हे ड्रायफ्रुट्स आधी भाजले नसतील तर त्याच पॅनमध्ये थोडेसे भाजून घेऊ शकता.
यानंतर नारळात 1 कप उरलेल साय घाला.
जर ते फ्रोझन क्रीम असेल तर ते पॅनमध्ये थोडे गरम करा आणि नंतर ते चांगले मिक्स करा.
सर्व गोष्टी एकत्र करून नीट लाटून छोटे लाडू बनवा.
फ्रिजरेटरमध्ये सेट करण्यासाठी ठेवा आणि आस्वाद घ्या.
साखरेसोबत साय
घरात फ्रेश साय असेल तर तुम्ही साखर टाकून खाऊ शकता. साखर-साय खाण्याची मजाच वेगळी असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.