Eggs Storage Tips: अंडी फ्रीजमध्ये ठेवावी की बाहेर? जाणून घ्या स्टोअर करण्याची योग्य पद्धत

Eggs Storage Kitchen Hack: अनेक लोकांचा असा विश्वास आहे की अंडी फ्रीजमध्ये ठेवल्याने अंड्यांचे शेल्फ लाइफ वाढते, तर काहींच्या मते ते फ्रीजमध्ये ठेवल्याने अंडी खराब होतात.
Eggs Storage Kitchen Hack
Eggs Storage Kitchen HackDainik Gomantak
Published on
Updated on

Eggs Storage Tips: अंडी योग्यरित्या स्टोअर करणे फार महत्वाचे आहे. कारण अंडी चुकीच्या पद्धतीने स्टोअर केल्यास ते खराब होऊ शकतात. अनेकदा लोकांना हेच कळत नाही की अंडी फ्रिजमध्ये ठेवावी की रूममधील सामान्य तापमानात?

अनेक लोकांचा असा विश्वास आहे की अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास जास्त काळ टिकतात. पण ते योग्य प्रकारे स्टोअर केले नाही तर लवकर खराब होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया की फ्रिजमध्ये अंडी ठेवणे किती सुरक्षित आहे.

जाणून घ्या काय आहे साल्मोनेला

अंडी व्यवस्थित स्टोअर करणे गरजेचे असते. कारण अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाचे बॅक्टेरिया असतात. जे आरोग्यासाठी हानिकारक असतात.

साल्मोनेला हा एक प्रकारचा जीवाणू आहे जो सामान्यतः उबदार रक्ताचे प्राणी आणि पक्ष्यांच्या आतड्यांमध्ये आढळतो. जर ते अंड्यांपर्यंत पोहोचले तर ते मानवांसाठी खूप धोकादायक ठरू शकते.

सॅल्मोनेला बॅक्टेरियाची लागण झालेली अंडी खाल्ल्याने व्यक्तीला उलट्या, जुलाब, ताप, डोकेदुखी यांसारख्या समस्यांचा त्रास होतो. हा जीवाणू अंड्याच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पोहोचू शकतो.

हे अंड्यातील पिवळ बलक आतून आणि बाहेरून अंड्याचे बाह्य कवच संक्रमित करू शकते. म्हणून, योग्य तापमानात अंडी स्टोअर करणे खुप महत्वाचे आहे.

थंड तापमान आणि योग्य हाताळणी साल्मोनेला बॅक्टेरियाचा प्रसार थांबवतात आणि अंडी सुरक्षित ठेवतात. अंड्यांद्वारे होणारा साल्मोनेला संसर्ग अंडी योग्य पद्धतीने स्टोअर केल्याने टाळता येतो. 

फ्रीजमध्ये अंडी कशी ठेवावीत

अंडी स्टोअर करण्यासाठी सामान्य तापमानात म्हणजे साधारण 4 अंश सेल्सिअस तापमानात फ्रीजमध्ये ठेवणे चांगले असते. 

फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी साधारणपणे 3-5 आठवडे फ्रेश राहतात. 

अंडी त्यांच्या पॅकेजिंगच्या तारखेनुसार किंवा कालबाह्यता तारखेनुसार खावीत.

अंडी योग्य पद्धतीने स्टोअर केल्यास ताजी आणि सुरक्षित राहतात. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com