दुकानातील विकतचं तूप सोडा, 'या' भांड्याच्या मदतीने घरीच बनवता येईल शुद्ध तूप! सोपी आहे प्रोसेस

तुम्ही घरीच सोप्या पद्धतींचा वापर करून तुप तयार करू शकता.
Ghee
GheeDainik Gomantak
Published on
Updated on

easy tips for making Ghee: दुकानातील विकतच तुप वापरल्यापेक्षा गरचे तुप कधीही चांगले असते. अनेक महिला वेळे अभावी दुकानातील तुप वापरतात. पण तुम्हाला माहिती आहे का घरीच कुकरचा वापर करून शुद्ध तुप तयार करू शकता. ही पद्धत खुप सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया कुकरचा वापर करून तुप कसे तयार करावे.

  • साय जास्त दिवसांची नको

तुप तयार करण्यासाठी जास्त दिवस ठेवलेली साय वापरू नका. कारण यामुळे तुपाला चांगला वास येत नाही. साय ७ते ८ दिवस फ्रिजमध्ये ठेवावे. नंतर तुप तयार करण्यासाठी बाहेर काढावे. तसेच त्यात दही घालू नका.

  • प्रेशर कुकरचा वापर

प्रेशर कुकरच्या मदतीने तुम्ही झटपट तूप तयार करू शकता. यासाठी प्रेशर कुकरमध्ये एक वाटी पाणी ठेवा आणि त्यात जमा केलेली साय मिक्स करावी. नंतर गॅसवर ठेवावे आणि एक शिट्टी झाल्यावर गॅस बंद करावा. नंतर झाकण काढून परत गॅसवर ठेवावे आणि तूप तयार होईपर्यंत गॅस सुरू ठेवावा.

Ghee
Kitchen Hacks: धुतलेल्या भाड्यांना अंड्याचा वास येतोय? मग वापरा 'या' ट्रिक
  • शुद्ध तुपासाठी काय करावे

झाकण काढून कुकर परत गॅसवर ठेवल्यावर त्यात थोडे तूप तयार व्हायला सुरूवात झाली की त्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकावा. असे केल्याने तूप पूर्णपणे शुद्ध तयार होते. तसेच तूप जास्त दिवस टिकून राहते. नंतर ते फ्रीजमध्ये ठेऊ शकता.

  • दाणेदार तुप

तुम्ही घरीच दुकानातील विकतच्या तुपापेक्षा दाणेदार तूप बनवू शकता. यासाठी कुकरमध्ये साय शिजवताना त्यात १ चमचा पाणी मिक्स करावे. बेकिंग सोडा घातल्यानंतर काही वेळाने पाणी घालावे लागेल. नंतर साय तपकिरी होऊ लागल्यावर गॅस बंद करून कुकर काढावा. तूप थंड करून हवा बंद डब्ब्यात गाळून ठेवावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com