Kids Skin Care: थंडीत लहान मुलांच्या त्वचेची कशी घ्याल काळजी

हिवाळ्यात लहान मुलांच्या नाजूक त्वचेकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. कारण कडक हिवाळा आणि थंड वारा यामुळे मुलांची नाजूक त्वचा कोरडी आणि रफ होऊ शकते.
skin care tips
skin care tips Dainik Gomantak
Published on
Updated on

Kids Skin Care: लहान मुलांची त्वचा अतिशय नाजुक असते. मुलांची त्वचा प्रौढांपेक्षा 5 पट अधिक नाजूक असते. थंडीच्या दिवसांमध्ये लहान मुलांमध्ये कोरड्या त्वचेची समस्या जास्त असते. थंड वाऱ्यामुळे मुलांची त्वचा रफ, कोरडी आणि खाज सुटते आणि त्वचेची कोमलता कमी होते. मुलांच्या त्वचेची काळजी घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पालकांनी हिवाळ्यात मुलांच्या त्वचेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आणि काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्वचा निरोगी, मुलायम आणि चमकदार राहू शकते.

मॉइश्चरायझर


मॉइश्चरायझिंग क्रीमचा वापर मुलांच्या त्वचेच्या काळजीसाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात मुलांची त्वचा खूप कोरडी आणि रफ होते. क्रीम कसे निवडायचे ते जाणून घेऊया. 

  • क्रीममध्ये डायमेथिकोन, सिरॅमाइड्स, ग्लिसरीन सारखे घटक असावेत जे त्वचा मऊ आणि कोमल ठेवतात.

  • व्हिटॅमिन ई समृद्ध क्रीम मुलांच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.

  • सुगंधित किंवा रंगीत क्रीम ऐवजी, सुगंध आणि रंग मुक्त क्रीम निवडा.

  • क्रीममध्ये पीएच बॅलन्स असणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून ते त्वचेला अधिक कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करते.

  • हे क्रीम हलक्या हातांनी मुलांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर लावा. 

नारळाचे तेल 


नारळाचे तेल मुलांच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. बाळाला आंघोळ केल्यानंतर खोबरेल तेल लावा. ते ओलावा टिकवून ठेवते. आंघोळीच्या एक तास आधी तेल लावून मसाज करू शकता. हे देखील त्वचेसाठी फायदेशीर आहे. खोबरेल तेलामध्ये व्हिटॅमिन ई असते. ज्यामुळे त्वचा निरोगी होते. अशाप्रकारे तेलाने मसाज केल्याने मुलांची त्वचा मुलायम आणि कोमल राहते. 

उबदार कपडे

जास्त लोकरीचे कपडे परिधान केल्याने उष्माघात होण्याची शक्यता वाढते. यासाठी दररोज मुलांच्या त्वचेची तपासणी करावी. उष्मा पुरळ झाल्यास, हलके आणि मऊ लोकरीचे कपडे घालावे. लोकरीच्या कपड्यांचा त्वचेशी थेट संपर्क झाल्यामुळे पुरळ आणि खाज येऊ शकते. सुती कपड्यांवर लोकरीचे कपडे घाला जेणेकरुन लोकरीचे कपडे थेट स्पर्शात येणार नाहीत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com