Tulsi: तुलशीच्या मंजुळा तोडतांना 'या' नियमांचे करावे पालन

Tulsi Plant: तुळशीचे पान किंवा मंजुळा तोडताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
Tulsi
Tulsi Dainik Gomantak
Published on
Updated on

keep these things in mind while touch basil tulsi and plucked manjula

तुळशीला हिंदू धर्मात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. यामुळे तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते आणि घरात ठेवण्यासाठी अनेक नियम केले जातात. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीची नित्य पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी कायम वास करते.

यामुळेच लोक घरी तुळशीचे रोप लावणे शुभ मानतात आणि विधीनुसार रोज त्याची पूजा करतात. कारण आपल्या शास्त्रात तुळशीला माता म्हटले गेले आहे आणि तिचे धार्मिक महत्त्वही सांगितले आहे. हे घरामध्ये ठेवल्याने वास्तुदोष दूर होऊन सुख-समृद्धी येते.

मांजुळा तोडण्याचे नियम

तुळशीच्या झाडावरील फूल तुळशीमातेच्या मस्तकावर ओझे असते, त्यामुळे ते तोडावे, असे मानले जाते. पण ते तपकिरी रंगाचे झाल्यावर ते तोडून टाकावे. तुळशीच्या मंजुळा रविवारी किंवा मंगळवारी कधीही तोडू नका. मंगळवार आणि रविवारी तुळशीची पाने कधीही तोडू नका. याशिवाय तुळशीची पाने तोडल्यानंतर ती कोणाच्याही पायाखाली येणार नाहीत याची खास काळजी घ्यावी.

विष्णूला प्रिय

तुळशीचे रोप भगवान विष्णूला खुप प्रिय आहे. म्हणून भगवान विष्णूची पूजा करताना तुळशीचे पानं अर्पण केले पाहिजे. द्वादशी तिथीला भगवान विष्णूला तुळशीची मंजुरा अर्पण केली जाते. तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. तुळशीमातेची पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद सदैव राहतो असे म्हणतात. यामुळेच लोक पूर्ण विधीपूर्वक तुळशीमातेची पूजा तर करतातच, पण संध्याकाळी तुळशीजवळ दिवा आणि अगरबत्ती लावतात.

या दिवशी तुळशीला स्पर्श करू नका

तुळशीच्या रोपाला दररोज पाणी घालण्याचा आणि त्याची पूजा करण्याचा नियम आहे. परंतु धार्मिक मान्यतेनुसार रविवारी आणि मंगळवारी तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नका. तुळशीच्या रोपाला हात लावू नका किंवा त्याची पाने तोडू नका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com