ऑनलाइन डेटिंग करताना या गोष्टी घ्या लक्षात, अन्यथा अडचणींचा करावा लागले सामना

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत
keep these things in mind during online dating to avoid getting in trouble
keep these things in mind during online dating to avoid getting in troubleDanik Gomantak
Published on
Updated on

आजकाल फेसबुक, व्हॉट्सअॅप इत्यादी सोशल मीडिया साइट्स न वापरणारे फार कमी लोक असतील. या सोशल मीडिया अॅप्सच्या माध्यमातून तुमची अनेक अनोळखी लोकांशी भेटही होते आणि मग बोलणे सुरू होते. या संवादाचे रुपांतर कधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात होते, हे कळतही नाही. अशा परिस्थितीत, अनेक वेळा लोक ऑनलाइन डेटिंगशी संबंधित फसवणुकीचे बळी ठरतात, या फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. (keep these things in mind during online dating to avoid getting in trouble)

ऑनलाइन डेटिंग अॅप टिपा

1) फोटो आणि व्हिडिओ शेअर करू नका- जर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलू लागला असाल तर त्यांच्यासोबत जास्त फोटो आणि व्हिडिओ शेअर करू नका. जरी तुम्ही त्यांना अनेक महिन्यांपासून ओळखत असाल तरीही हे करू नका. तुमची छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. तुमच्या फोटो आणि व्हिडिओंचा कोणीही गैरवापर करू शकतो.

keep these things in mind during online dating to avoid getting in trouble
मदर्स डेसाठी करा असा प्लॅन, जिंकाल आईचं मन

2) भेटण्याची सुप्रसिद्ध ठिकाणे - जर तुम्ही दोघे भेटण्याचे ठरवत असाल, तर तुम्हाला जागा निवडताना खूप काळजी घ्यावी लागेल. एकमेकांच्या घरी भेटू नका. तुम्ही तुमच्या माहितीत असलेली जागा निवडा. जर ते ठिकाण तुमच्या ओळखीचे नसेल तर एखाद्या मित्राला सोबत घेऊन जा.

3) जास्त वैयक्तिक माहिती शेअर करू नका - जेव्हा नातेसंबंध नुकतेच सुरू होत असतील तेव्हा सर्व गोष्टींबद्दल पूर्णपणे मोकळेपणाने बोलू नका. तुमच्याशी संबंधित सर्व माहिती देण्यापूर्वी अनेक वेळा विचार करा आणि शक्य असल्यास काही दिवस थांबा.

4) घाईघाईत कुटुंबासोबत भेट घडवू नका- जर तुम्ही नातेसंबंधात पुढे जाण्याचा विचार करत असाल आणि तुमच्या जोडीदाराची कुटुंबाशी ओळख करून देण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका. अनेकवेळा लोक डेटिंग अॅपवर टाईमपासही करत असतात, त्यामुळे नीट पाहिल्यानंतर त्यांची तुमच्या कुटुंबाशी ओळख करून द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com