Kajri Teej 2022: पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला करतात निर्जल उपवास, जाणून घ्या विधी अन् मुहूर्त

Kajari Teej Bhadrapad Month 2022: कजरी तीजचा उपवास अविवाहित मुली इच्छित वर मिळावा या उद्देशाने करतात हे व्रत केल्याने भगवान शंकरांच्या कृपेने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात
Kajri Teej 2022
Kajri Teej 2022
Published on
Updated on

Kajari Teej Vrat 2022 Puja Vidhi: हिंदू पंचांगानुसार, कजरी तीजचा (Kajari Teej 2022) उपवास दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येतो. यावर्षी कजरी तीज व्रत आज रविवारी आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनाच्या प्राप्तीसाठी विवाहित स्त्रिया कजरी तीजचे व्रत करतात.

या व्रतामध्ये महिला दिवसभर उपवास ठेवतात व नियमानुसार भगवान शिव, माता पार्वती आणि निमडी मातेची पूजा करतात आणि संध्याकाळी चंद्र पाहून त्यांना अर्घ्य अर्पण करून उपवास सोडतात. कजरी तीजचा उपवास अविवाहित मुलीही चांगला आणि इच्छित वर मिळावा या उद्देशाने पाळतात. कजरी तीज व्रत केल्याने मुलींना योग्य वर मिळतो आणि भगवान शंकरांच्या कृपेने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात असा समज आहे. उपवास करणाऱ्या स्त्रियांनी कजरी व्रताच्या वेळी विसरूनही हे काम करू नये, अन्यथा अशुभ प्राप्ती होते. त्यामुळे मनाला अपेक्षित फळ मिळत नाही.

Kajri Teej 2022
Shravan Special 2023: श्रावणात 7 गोष्टींचे दान केल्यास भोलेनाथांची होईल कृपा
  • कजरी तीज करणाऱ्या महिलांनी हे काम चुकूनही करू नये ( Avoid these Mistakes On Kajari Teej 2022 Vrat )

कजरी तीज व्रताच्या दिवशी आपल्या पतीला शिवीगाळ करू नका आणि त्याच्याशी भांडण करू नका.

कजरी तीज व्रतामध्ये तुमच्या पतीसोबत एका चांगल्या मित्राप्रमाणे वर्तन करा

कजरी तीज व्रताच्या दिवशी विवाहित महिलांनी हातावर मेंदी लावावी कारण मेंदी लावणे खूप शुभ असते.

विवाहित महिलांनी हातात बांगड्या घालणे आवश्यक आहे, कारण रिकामे हात ठेवणे अशुभ आहे.

कजरी तीज व्रत निर्जल व्रत असते.

मोठ्यांचा अपमान करू नका, सकाळी उठून त्यांचे आशीर्वाद घ्या.

कजरी व्रतामध्ये विवाहित महिलांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्यास विसरू नये. हे अत्यंत अशुभ मानले जाते.

कजरी तीज तिथी

13 ऑगस्टच्या रात्री 12:53 पासून तृतीया तिथी सुरू झाली. आणि आज दुसऱ्या दिवशी 14 ऑगस्टच्या रात्री 10.35 मिनिटांपर्यंत राहील. यावेळी 14 ऑगस्ट रोजी कजरी तीजचा सण साजरा केला जात आहे.

Kajri Teej 2022
Goa Shravan Culture : गोव्यातला श्रावण.. निसर्ग समृद्धतेने आणि परंपरेने नटलेला!

कजरी तीजची पूजा करण्याची पध्दत

काजरी तीजच्या दिवशी महिला सकाळी स्नान करून उपवास धरतात. त्यानंतर कडुनिंबाच्या झाडाला पाणी, रोळी आणि अक्षता अर्पण करा. यानंतर झाडाला काजळ आणि वस्त्र अर्पण करून पुजा करावी. पूजेत वापरल्या जाणाऱ्या कलशावर रोळीने टिका लावून धागा बांधावा. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून पाच सुहासिनीला गोड वस्तू दान करावी. रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर उपवास सोडता येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com