Food: गुरुनानक जयंती यावर्षी 08 नोव्हेंबर म्हणजेच आज साजरी होत आहे. गुरू नानक जयंतीला प्रकाश पर्व असेही म्हणतात. शीख कुटुंबांमध्ये प्रकाशपर्व निमित्त काही खास पाककृती तयार केल्या जातात. यापैकी एक म्हणजे कडा प्रसाद. कडा प्रसादाची चव खूप भारी असते. ही रेसिपी बनवायला पण खूप सोपी आहे.
कडा प्रसाद बनवण्यासाठी तो बराच वेळ तुपात शिजवला जातो. यावेळी गुरू नानक जयंतीच्या दिवशी तुम्हालाही जर कडा प्रसाद बनवायचा असेल तर, आमची रेसिपी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. चवदार कडा प्रसाद बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, गावरान तूप आणि साखर वापरली जाते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कडा प्रसाद खूप आवडतो. चला जाणून घेऊया..कडा प्रसाद बनवण्याची अगदी सोपी रेसिपी.
कडा प्रसाद बनवण्यासाठी साहित्य
गव्हाचे पीठ (जाडसर)- 1 कप, देशी तूप -1 वाटी, साखर -1 कप (चवीनुसार), काजू, पिस्ता क्लिपिंग -1 टीस्पून, पाणी - 4 कप.
कडा प्रसाद कसा बनवायचा
कडा प्रसाद बनवण्यासाठी प्रथम एक तवा किंवा जाड तळाचे भांडे घ्या. आणि त्यात पाणी टाका. मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा.
दरम्यान, दुसरे पॅन घ्या आणि त्यात तूप टाका. मग मध्यम आचेवर तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप वितळल्यावर गॅस कमी करा. त्यात बारीक वाटलेले गव्हाचे पीठ घाला. आणि चमचाने चांगले हलवून मिक्स करा. पिठाचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हलवत रहा.
पुढे, पिठाचा रंग सोनेरी तपकिरी झाल्यावर त्यात १ वाटी साखर किंवा चवीनुसार साखर (sugar) घालून मिक्स करा. दरम्यान, गरम करून ठेवलेले पाणी उकळू लागल्यावर गॅस बंद करा. आता हे गरम पाणी पिठात हळूहळू ओता आणि चमचाने चांगले हलवून मिक्स करा. आणि कड प्रसादात गुठळ्या राहणार नाहीत, याची काळजी घ्या.
यामध्ये जेव्हा पाणी पिठात चांगले मिसळते आणि पिठ घट्ट होते. तेव्हा गॅस वाढवा आणि पॅन झाकून ठेवा. मग कडा प्रसाद किमान 10 मिनिटे शिजू द्या. या दरम्यान अधूनमधून प्रसाद हलवावा. त्यात असलेले पाणी पूर्णपणे कोरडे होईपर्यंत कडा प्रसाद शिजवा. त्यानंतर गॅस बंद करा. चविष्ट कडा प्रसाद तयार आहे. काजू आणि पिस्त्याने सजवून सर्व्ह करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.