jai hanuman
jai hanumanDainik Gomantak

Jai Hanuman: हनुमानाची कृपा हवी असेल तर मंगळवारी 'हे' उपाय करा

मंगळवार हा रामभक्त हनुमानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी मनोभावे पुजा केल्यास अनेक समस्या दूर होतात.
Published on

Jai Hanuman मंगळवार हा दिवस राम भक्त हनुमान जी यांना समर्पित आहे. धार्मिक मान्यतांनुसार कलियुगात हनुमानजी हे एकमेव देव आहेत. भक्ताने केवळ मंत्रोच्चार केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात. बजरंग बालीला संकट मोचन असेही म्हटले जाते.

मंगळवारी केलेल्या उपासनेने हनुमानची प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व दुःखे आणि संकटे दूर करतात. मंगळवारी असे काही उपाय आहेत, जे केल्याने हनुमानजी लवकर प्रसन्न होतात. ज्यामुळे प्रत्येक संकटांपासून मुक्ती मिळते. 

jai hanuman
Tri Color Dhokla: सहजसोपी रेसिपी अन् जिभेवर रेंगाळती चव! स्वातंत्र्यदिन साजरा करा तिरंगा ढोकळ्यासोबत...

मंगळवारी कोणते उपाय करावे?

  • मंदिरात तुपाचा दिवा लावावा

मंगळवारी सकाळी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावा आणि हनुमानजींना अंगरखा घाला आणि लाडू अर्पण करून हनुमान चालिसाचे पठण करावे. हा उपाय केल्याने भक्तांवर बजरंग बलीची कृपा होते आणि मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात. 

  • गुळ, हरभराचे दान करावे

जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल तर 11 मंगळवारपर्यंत गूळ, हरभरा, तीळ, शेंगदाणे इत्यादी माकडांना खाऊ घालावे. माकडांना खाऊ घालणे शक्य नसेल तर या सर्व वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे. 

  • रूईचे फुल अर्पण करावे

मंगळवारी संध्याकाळी हनुमानजींची पूजा करताना रूईचे फुल,उडीद डाळ आणि तेल अर्पण करावे. यामुळे हनुमानजी प्रसन्न होतात. 

  • रक्षास्त्रोतचे पठण करावे

मंगळवारी हनुमानजींची पूजा करताना रक्षास्त्राचे पठण करावे. यामुळे हनुमानजींच्या कृपेने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. 

  • इतर उपाय

मंगळवारी वाईट नजर टाळण्यासाठी ज्वारीच्या पिठात काळे तीळ मिक्स करून त्यात गूळ आणि मोहरीचे तेल घालून म्हशीला खायला द्यावे. यामुळे वाईट नजरेचा प्रभाव दूर होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com