Janmashtami  Decoration Ideas
Janmashtami Decoration IdeasDainik Gomantak

Janmashtami 2021: सजावटीसाठी या आहेत 5 Ideas

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त करा अशी सुंदर सजावट.
Published on

* फुले

देवघर सजवण्यासाठी हा एक सोपा मार्ग आहे. विविध रंगांच्या फुलांनी (Flowers) सजवलेले देवघर खूप आकर्षक दिसते. कृष्ण जन्माष्टमीला (Janmashtami) तुम्ही सुंदर फुलांची सजावट करू शकता. श्री कृष्णाला चमेली, मोगरा, पारिजात यासारखी सुगंधी फुले आवडतात. या फुलांचा हार करून तुम्ही देवघर सजवू शकता. या फुलांच्या माळा तुम्ही कृष्णाच्या पाळण्यालासुद्धा लावून सजावट करू शकता.

Dainik Gomantak

* फेरी लाइट्स

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त (Janmashtami) तुम्ही श्री कृष्णाचा पाळणा फेरी लाइट्सने सजवू शकता. निळ्या पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या या सुंदर चमकणाऱ्या लाइट्सने देवघर अधिक आकर्षक आणि सुंदर दिसते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेसुद्धा लायटिंग करू शकता.

Dainik Gomantak

* रांगोळी

कोणताही सण किंवा उत्सव असल्यास आपण घरासमोर पारंपारिक पद्धतीने रंगोळी काढतो. तुम्ही जन्माष्टमीनिमित्त (Janmashtami) सुंदर रांगोळी काढू शकता. देवघरासमोर तुम्ही विविध रंगांनी श्री कृष्णाच्या स्वागतासाठी देवघरासमोर सुंदर अशी रंगोळ काढू शकता.

Dainik Gomantak

* दहीहंडी तयार करा

श्री कृष्णाला दही आणि लोणी प्रिय आहे. बाळ गोपाळ लोणी चोरून खात असल्याने त्यांला 'माखन चोर' म्हंटले जाते. दहीहंडी तयार करण्यासाठी तुम्ही दहीहंडी विकत आणू शकता किंवा घरीच तयार करू शकता. हंडीला सोनेरी रंगाची रिबिन आणि काचेच्या टिकल्याणी सजावट करू शकता. नंतर त्यात दही भरावे.

Dainik Gomantak

* बासरीची सजावट

श्री कृष्णाला बासरी हे वाद्य प्रिय आहे. बासरी हे आनंदाचे प्रतीक आहे.याचा अर्थ असा की कोणत्याही परिस्थितीत आपण नेहमी आनंदी राहायला हवे. स्वत: आनंदी राहून दुसऱ्यांनासुद्धा आनंदी ठेवावे. ज्याप्रमाणे कृष्णा स्वत: बासरी वाजवून आनंदी राहायचा आणि दुसऱ्यांना आनंद द्यायचा.तुम्ही बासुरीला गोल्डन रिबिन आणि रंगीबेरंगी टिकल्या लावून सजवू शकता.

Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com