
Diabetes Diet Myths And Facts: देशात गेल्या काही वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तरुणांनाही या आजारानं ग्रासलं आहे. दरम्यान, आजार नियंत्रण ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धती अवलंबतात. बरेच लोक भात खाणे बंद करतात, तर काहीजण गव्हाच्या पिठामध्ये बाजरी आणि नाचणीचे पीठ मिसळून बनवलेल्या रोट्या खाणे पसंत करतात. याशिवाय, अनेकांना असे वाटते की, जर त्यांनी रात्रीचे जेवण टाळले तर त्यांची साखरेची पातळी नियंत्रणात राहील, पण असे करणे खरोखर योग्य आहे का? चला तर मग मधुमेही रुग्णांसाठी रात्रीचे जेवण न करण्याचे फायदे आणि तोटे काय असू शकतात ते जाणून घेऊया...
मधुमेह (Diabetes) असणाऱ्या लोकांसाठी ठरलेल्या वेळी जेवण करणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही रात्रीचे जेवण केले नाही तर शरीरातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतो. कधीकधी जेवण न केल्याने साखरेची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे चक्कर येणे किंवा अशक्तपणा येणे यासारख्या घटना घडू शकतात. एवढेच नाहीतर शरीर जास्त ग्लुकोज तयार करु लागते, ज्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते. म्हणून, जर कोणी मधुमेहाचा रुग्ण असेल तर त्याने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कधीकधी टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी उपवास करणे देखील चांगले मानले जाते. यामुळे शरीरात इन्सुलिन योग्यरित्या कार्य करते, परंतु सर्व मधुमेही रुग्णांमध्ये इन्सुलिन योग्यरित्या कार्य करेल असे नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना वेगळी असते. अशा परिस्थितीत, जर कोणी उपाशी राहिला तर त्याची साखरेची पातळी वाढू किंवा कमी होऊ शकते.
मधुमेही रुग्णांनी जास्त वेळ उपाशी राहू नये. अशक्तपणा, थकवा आणि चक्कर येणे यासारख्या समस्या वाढू शकतात. जर शरीराला वेळेवर अन्न मिळाले नाही तर साखरेची पातळी अचानक खूप कमी होते, जी धोकादायक ठरु शकते. रिकाम्या पोटी झोपल्याने वारंवार जाग येऊ शकते. रिकाम्या पोटी राहिल्याने देखील अपचन होऊ शकते. जर तुम्ही वारंवार जेवण टाळले तर शरीराच्या पचनसंस्थेवरही परिणाम होऊ शकतो.
तज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी रात्रीचे जेवण न करणे टाळू नये. तथापि, त्यांनी लवकर जेवण करावे. त्यांनी रात्री 8 वाजेपर्यंत जेवण केले पाहिजेत. रात्री हलके अन्न खाणे आरोग्यासाठी (Health) फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी दर 3 तासांनी काहीतरी हलके खावे. जास्त जेवण करु नये.
रात्रीचे जेवण बिलकुल टाळू नका. त्यापेक्षा हलके आणि पौष्टिक अन्न खा. डाळी, भाज्या, रोटी आणि सॅलड यासारख्या गोष्टी खा. जास्त तळलेले आणि गोड पदार्थ खाणे टाळा. झोपण्यापूर्वी 2-3 तास आधी जेवण करा जेणेकरुन पचन व्यवस्थित होईल. तत्पूर्वी, आहारात कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.