Superfood For Mens: 'हे' सुपरफूड पुरुषांसाठी ठरतात वरदान

International Men's Day 2022: पुरुषांचे आरोग्य निरेगी राहण्यासाठी सुपरफूड गरजेचे आहे.
Superfood For Mens
Superfood For MensDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरात आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Men's Day 2022) साजरा केला जात आहे. हा विशेष दिवस म्हणजे पुरुषांच्या कल्याण आणि आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी केला आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महिला असो वा पुरुष दोघांनीही आहारात काही पोषक घटकांचा समावेश करणे गरजेचे असते.आजकाल पुरुषांना प्रोस्टेट कर्करोग, हृदय, उच्च कोलेस्ट्रॉल, साखर, रक्तदाब आणि लैंगिक आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आहेत. हे आजार टाळण्यासाठी आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे.

Almond
AlmondDainik Gomantak

बदाम तुमची त्वचा (Skin) , पचन आणि हृदयाच्या आरोग्यासाठी सुपरफूड ठरते. ते निरोगी असंतृप्त चरबीने भरलेले असतात, त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ई आणि प्रथिने देखील असतात.तुम्ही तुमच्या आहारात बदाम वेगवेगळ्या प्रकारे समाविष्ट करू शकता.

Spinach
SpinachDainik Gomantak

पालक कॅल्शियम, फायबर आणि कॅरोटीनने परिपूर्ण आहे.निरोगी रोगप्रतिकारक शक्तीसाठीही पालक खूप फायदेशीर आहे.चांगल्या दृष्टीसाठी कॅरोटीन आवश्यक आहे.पालकामध्ये फोलेट देखील असते, जे पुरुषांच्या (Men) लैंगिक कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.तुम्ही तुमच्या प्रोटीन शेकमध्ये पालक घालू शकता.

Brokoli
BrokoliDainik Gomantak

ब्रोकोलीमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असतात. जे रोगप्रतिकारक आणि रक्ताभिसरण प्रणालींना मदत करते. काही लोक ब्रोकोली तळून खाणे पसंत करतात

Oats
OatsDainik Gomantak

हेल्थ फ्रिक लोक त्यांच्या आहारात ओट्सचा समावेश करतात. उच्च रक्तदाब, वजन वाढणे आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी हे उत्तम आहे. आपल्या आहारात फायबर समाविष्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. हे पुरुषांच्या लैंगिक कार्यासाठी देखील फायदेशीर आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com