Health Tips : हिवाळ्यात न्यूमोनियाच्या प्रकरणांमध्ये वाढ, काय काळजी घ्यावी?

बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक परिणाम लहान मुले, वयोवृद्ध, अशक्त व्यक्ती यांच्यावर होतो. लहान मुलांमध्ये न्यूमोनिया आणि श्वासोच्छवासाच्या समस्येत वाढ झाली आहे.
Health Tips
Health Tips Dainik Gomantak

बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक परिणाम लहान मुले, वयोवृद्ध, अशक्त व्यक्ती यांच्यावर होतो. लहान मुलांमध्ये न्यूमोनिया आणि श्वासोच्छवासाच्या समस्येत वाढ झाली आहे. फ्लू, पोटातील कृमी आणि इतर संक्रमण वेगाने पसरत आहेत. ज्यांना मधुमेह आणि दमा यासारख्या समस्या आहेत त्या मुलांची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. यावर वेळीच उपचार करणे महत्वाचे आहे.

हिवाळा हा श्वसनाच्या आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देतो. हवामानातील सततच्या बदलांमुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या बालकांना फुफ्फुसाच्या दीर्घकालीन समस्या जसे की दमा, ब्राँकायटिस, जन्मजात हृदयरोगाचा सामना करावा लागतो. किडनीचे आजार आणि इतर श्वसनाच्या परिस्थितीमुळे न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. हे प्राणघातक ठरत आहे आणि त्यामुळे फुफ्फुसाचे गंभीर नुकसान होऊ शकते.

Health Tips
Health Tips: पुरेशी झोप ठेवते शारीरिक आणि मानसिक आजारांना दूर

हिवाळ्यात संसर्गजन्य आजार जास्त प्रमाणात आढळतात कारण जेव्हा एखादी आजारी व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा कोरड्या हवेत हे थेंब अधिक सहजतेने पसरतात. बदलत्या वातावरणामुळे लहान मुले विषाणूजन्य साथीच्या रोगांचा सामना करत आहेत.

Health Tips
Health Tips: हिवाळ्यात सांधेदुखीने त्रस्त आहात? ‘या’ उपायांनी मिळेल आराम

काय काळजी घ्यावी?

मुलांना जास्त गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळावे, आजारी लोकांशी संपर्क मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करावा, खोकताना तोंड व नाक झाकून घ्यावे, हात चांगले धुवावेत, संतुलित आहाराचे सेवन करावे आणि न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे श्वासोच्छवासाचे व्यायाम करावेत. हिवाळ्यात, मुलांना उबदार कपडे घाला, त्यांना पिण्यासाठी गरम सूप द्या, घरी ह्युमिडिफायर वापरा आणि प्रदूषण टाळा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com