प्रथिनांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आहारात या नैसर्गिक पदार्थांचा समावेश करा

एकूणच आरोग्यासाठी आपण आपल्या आहारात अधिकाधिक प्रथिनेयुक्त अन्नाचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.
protein
proteinDainik Gomantak
Published on
Updated on

Protein Rich Foods: एकूणच आरोग्यासाठी आपण आपल्या आहारात अधिकाधिक प्रथिनेयुक्त अन्नाचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरातील प्रथिने पेशींची रचना तयार करण्याचे, रोगप्रतिकारक शक्तीला निरोगी ठेवण्याचे, स्नायू, एंजाइम, त्वचा आणि हार्मोनल असंतुलन योग्य ठेवण्याचे काम करते.

त्वचेपासून केसांपर्यंत, आपल्या शरीरातील ऊतक हे सर्व प्रथिनांनी बनलेले असतात. जर शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर आपल्या शरीरात अनेक समस्या येऊ शकतात. उदाहरणार्थ, शरीरावर सूज येणे, फॅटी लिव्हर, संसर्ग वाढणे, वाढ खुंटणे इ. चला तर मग जाणून घेऊया शरीरातील प्रोटीनचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला जाऊ शकतो.

  • हे प्रथिनेयुक्त पदार्थ आहेत

अंडी

अंडी हे सर्वात पौष्टिकतेने समृद्ध अन्न आहे. विशेषतः अंड्याचा पांढरा भाग हा शुद्ध प्रथिने असतो. तर संपूर्ण अंड्यांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे असतात.

protein
Egg Effect: जास्त अंडी खाल्ल्याने 'हे' लोक पडू शकतात आजारी

बदाम

बदाममध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. त्याला वनस्पती आधारित प्रथिने म्हणतात. बदामाच्या एक बीमध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रोटीन असते.

चिकन ब्रेस्ट

जर तुम्ही डायटमध्ये चिकन ब्रेस्टचा समावेश करत असाल ते चांगल आहे कारण त्यामध्ये प्रोटीन भरपूर आहे. हे सहज शिजवले जाते आणि तुम्ही ते तुमच्या नाश्त्यात सॅलड म्हणूनही खाऊ शकता.

दही

क्रीमयुक्त पोत असलेले घट्ट दही म्हणजे ग्रीक दह्यामध्ये देखील प्रथिने आहेत. यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी12, सेलेनियम, व्हिटॅमिन ए आणि झिंक भरपूर प्रमाणात असते.त्याचप्रमाणे दुधात इतर पोषणासोबत प्रथिने देखील मुबलक प्रमाणात आढळतात . एक कप दुधात सुमारे 9 ग्रॅम प्रोटीन आढळते.

protein
Travelling Tips: ट्रिप अविस्मरणीय बनवण्यासाठी खास टिप्स

मसूरमध्ये वनस्पती-आधारित प्रथिने देखील मुबलक प्रमाणात आढळतात . संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक रोज मसूराचे सेवन करतात त्यांना फॅटी लिव्हर रोग किंवा हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com