धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या भेडसावत आहे. आजकाल प्रत्येक तिसरा व्यक्ती उच्च रक्तदाबाने त्रस्त आहे. अलिकडे तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या दिसून येत आहे. उच्च रक्तदाब कोणत्याही वयात होऊ शकतो. वाढत्या वयात उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर ते हृदयविकाराचा झटका यासारखी समस्या निर्माण होऊ शकते.
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी, निरोगी आहार आणि सवयींचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी पाणी अतंत्य फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत पाणी पिण्याचे नियम आणि यासाठी कोणत्या सवयी महत्वाच्या आहेत.
हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे
आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नेहमी हायड्रेटेड राहणे खूप आवश्यक आहे. डिहायड्रेशन आणि रक्तदाब यांचा फार जवळचा संबंध आहे. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने आपले शरीर हायड्रेटेड राहते. शरीर हायड्रेट ठेवल्याने आपले हृदय योग्य प्रकारे कार्यरत राहते. यामुळे आपल्या रक्ताभिसरणही योग्य राहते.
दररोज किती पाणी प्यावे?
व्हेरीवेल हेल्थच्या अहवालानुसार, महिलांनी दररोज 2.7 लिटर पाणी प्यावे. तर पुरुषांनी दररोज 3.7 लिटर पाणी प्यावे. काही फळे आणि भाज्यांमध्येही पाण्याचे प्रमाण आढळते, ज्यामुळे आपले शरीर हायड्रेटेड राहते आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो.
योग्य प्रमाणात पाणी पिणे महत्वाचे
हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, योग्य प्रमाणात पाणी प्यावं. एका संशोधनातून असे आढळून आले आहे की, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिसळलेले पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियमसाठी पुदिना, काकडी, लिंबू आणि जांभूळ मिश्रित पाणी पिऊ शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.