Turmeric Upay: भारतात मोठ्या प्रमाणात हळदीचा वापर केला जोतो. तसेच हळदीला आयुर्वेदात औषधीयुक्त पदार्थ म्हणुन वापर केला जातो. आजारी पडल्यास दुधात हळद घालुन सेवन केले जाते.
स्वयंपाक घरात हळदीचा वापर मसाला म्हणुन केला जातो. धणं,जीरं,मोहरी,हिंग आणि हळद घरातल्या मसाल्याच्या डब्यात या गोष्टी आजही हमखास असतातच. पूर्वी आजीच्या बटव्यात काही गोष्टी ठेवलेल्या पाहायला मिळायच्या. आजही घरातल्या चिमुकल्याच्या पोटात गॅस झाला आणि पोट दुखायला लागले तर घरातली आजी त्या मुलाच्या बेंबीवर हिंगाची पेस्ट लावते आणि थोड्याच वेळात तो मुलाचे त्रास कमी होतात.
हळद आणि हळदीचे गुणकारी फायदे तर सर्वांनाच माहिती आहेत पण हळद नाभी किंवा बेंबीवर लावल्यास त्याचे काही ज्योतिषीय लाभ मिळतात हे जाणुन घेउया.
ज्योतिष शास्त्रात काय सांगितले आहे
ज्योतिष शास्त्र असे सांगते की नाभीमध्ये हळद लावल्यास तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) बेंबी ही अशी जागा आहे जिथून आपली जीवनशक्ती बाहेर पडते. त्यावर हळद लावल्याने रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढते. यामुळे शरीराला कोणत्याही प्रकारे संसर्ग होत नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार नाभीला शरीरातील केंद्र आणि शक्तिशाली बिंदू मानले गेले आहे. त्यावर हळद लावल्याने शरीरातील ऊर्जेचा प्रवाह सक्रिय आणि संतुलित होतो.
ज्योतिष शास्त्रात मानले जाते की नाभीमध्ये हळद लावल्यास तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होते. तसेच मन:शांती वाढते.
ज्योतिषशास्त्रानुसार नाभीवर हळद लावल्याने शरीरातील सर्व दोषांचा समन्वय राखला जातो. ज्याने शारीरिक त्रासांपासून मुक्ती मिळते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.