Gmail: तुम्ही इंटरनेट नसलेल्या भागात काम करत असाल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही जीमेल चा वापर इंटरनेटशिवायही करू शकता. इंटरनेट कनेक्शनशिवाय ऑफलाइन मोडमध्ये जी-मेलचा वापर करता येतो. यामध्ये तुम्ही नवीन मेल आणि इतर ईमेल्स सर्च करू शकता.
इनेबल करावे ऑफलाइन मेल
सर्वप्रथम क्रोम ब्राउझरवर जीमेल ओपन करा. हा मोड इतर कोणत्याही ब्राउझरवर काम करणार नाही.
यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात सेटिंग्ज गियरवर क्लिक करा.
यानंतर Settings हा पर्याय निवडा.
त्यानंतर तुम्हाला ऑफलाइनवर क्लिक करावे लागेल.
यानंतर ऑफलाइन ईमेल बॉक्स चेकमार्क करा.
त्यानंतर ऑनलाइन प्रवेशासाठी तुम्हाला किती दिवस ईमेल सिंक करायचे आहेत ते निवडा. ही सुविधा 90 दिवसांसाठी उपलब्ध आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव, तुम्हाला संगणकावर ऑफलाइन डेटा ठेवायचा आहे की हटवायचा आहे हे निवडावे लागेल.
यानंतर Save Changes वर क्लिक करा.
ऑफलाइन एक्सेस कसे कराल
तुम्ही ऑफलाइन असताना, साध्या Chrome ब्राउझरवर mail.google.com या लिंकवर जावे.
यामध्ये तुम्हाला ऑफलाइन मोडचा मॅसेज कन्फर्म करावा लागेल.
यानंतर तुम्ही तुमचा इनबॉक्स ब्राउझ करू शकाल. तुम्हाला मॅसेज ड्राफ्ट करण्याची आणि मॅसेज वाचण्याची सुविधाही मिळेल.
ऑफलाइनसाठी टिप्स
ऑफलाइन मोडमध्ये, तुम्ही ऑफलाइन सिंक केलेले तुमचे मॅसेज शोधु शकता.
मेल अटॅचमेंट डाउनलोड करू शकत नाही. ते ऑफलाइन मोडमध्ये पाहू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.