Coconut Oil For Hair: पांढऱ्या केसांसाठी खोबरेल तेल ठरु शकते रामबाण उपाय

तुरटी आणि खोबरेल तेलाचा वापर करुन पांढऱ्या केसांपासून मिळवा सुटका.
Coconut Oil For Hair
Coconut Oil For HairDainik Gomantak

तुरटी आणि खोबरेल तेल या दोन्हींचे मिश्रण नक्कीच थोडे विचित्र आहे. पण या दोन्ही गोष्टी आश्चर्यकारक आहेत. तुरटीमध्ये सक्रिय कंपाऊंड असते. जे बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संक्रमण कमी करते. नारळाच्या तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. 

त्यामुळे केसांना (Hair) पोषण देण्याचे काम करते. यासोबतच हे केसांच्या आत म्हणजेच टाळूमध्ये मॉइश्चरायझर म्हणूनही काम करते. जेव्हाही तुम्ही हे दोन्ही मिक्स करून केसांमध्ये वापरता, तेव्हा केसांची समस्या कमी होते. पांढऱ्या केसांची समस्या काही प्रमाणात कमी करण्यासाठी हे गुणकारी आहे.

आजकाल लहान मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये केस पांढरे होण्याची समस्या सामान्य आहे. अशा परिस्थितीत तुम्ही एक गोष्ट करू शकता. पांढरे केस काळे करण्यासाठी प्रथम तुरटी आणि खोबरेल तेल घ्या आणि दोन्ही एकत्र मिक्स करा. केसांमध्ये कोलेजन वाढवण्यास आणि केस काळे होण्यास खूप मदत होते. खोबरेल तेल केसांचा रंग टिकवून ठेवण्यासही मदत करते. हे दोन्ही एकत्र लावल्यास केस काळे राहतात.

  • कोंड्याची समस्या नाहीशी होते

तुरटी आणि खोबरेल तेल एकत्र लावल्याने कोंड्याची समस्या कमी होते. हे दोन्ही अँटी बॅक्टेरियल तसेच अँटी फंगल आहेत. हे टाळू स्वच्छ करते तसेच कोंडा कमी करते.

Coconut Oil For Hair
WhatsApp Call Recording: आता व्हॉट्सअ‍ॅप कॉल पण करू शकता रेकॉर्ड...
  • केसांमध्ये तुरटी आणि खोबरेल तेल कसे वापरावे

प्रथम खोबरेल तेल गरम करा. आता तुरटी बारीक करून मिक्स करा. त्यानंतर ते थोडे गरम करावे. तोपर्यंत दोन्ही गरम करा. तेलाचा रंग बदलेपर्यंत. तेलाचा रंग बदलल्यानंतर ते थंड होऊ द्या आणि पुन्हा केसांना लावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com