Worship of Ekadashi : कशी करावी उत्पत्ती एकादशीची उपासना? जाणून घ्या शास्त्रीय पद्धत..

भगवान विष्णूला समर्पित असलेल्या एकादशीचे व्रत जो कोणी करतो त्याला सर्व तीर्थांचे पुण्य प्राप्त होते.
Worship of Ekadashi
Worship of Ekadashi Dainik Gomantak

असे मानले जाते की,  भगवान विष्णूला समर्पित असलेल्या उत्पत्ति एकादशीचे  व्रत नियमानुसार जो कोणी करतो त्याला सर्व तीर्थांचे पुण्य प्राप्त होते. म्हणूनच जाणून घेऊया आजच्या एकादशीचा शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत:-

हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात, एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात येते. प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी महत्त्वाची असते, पण उत्पन्न एकादशीचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे, जो कोणी या दिवशी भक्तीभावाने आणि श्रद्धेने उपवास करतो आणि विधीपूर्वक भगवान विष्णूंची पूजा करतो, त्याला इच्छित फळ मिळते. एकादशीचे व्रत आज (२० नोव्हेंबर २०२२) पाळले जाईल. त्याच वेळी, हा उपवास करावा.

Worship of Ekadashi
Benefits of Amla: 'यात' दडलंय चिरतारूण्याचं रहस्य!!

पूजेसाठी आवश्यक साहित्य-

अक्षता, हळद, कुंकू, गंध, फुले (विष्णुला चाफा, मोगरा, जाई, कुंद वगैरे फुले आवडतात), तुळशी, उदबत्ती, निरांजन, कापूर, पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर, साखर नसेल तर थोडा गूळ), तांब्या, पंचपत्र, ताम्हण, अभिषेकपात्र, भगवान विष्णूची मूर्ती इत्यादी.

एकादशी व्रत उपासना पद्धत-

प्रथम सकाळी लवकर उठून आंघोळ करून सूचिर्भूत व्हावे. स्वच्छ वस्त्र परिधान करावे, त्यानंतर गंध उगळून पूजेला सुरुवात करावी. तीनवेळा आचमन करावे. उजव्या हातात पळीभर घेऊन मनात इच्छित संकल्प म्हणून पाणी ताम्हणात सोडावे. त्यानंतर कलश, शंख, घंटा, समई यांना गंध-फूल अर्पण करावे. भगवान विष्णूंची षोडशोपचार पूजा करावी. त्यानंतर देवाला फलाहार - नैवेद्य दाखवून त्यांची आरती करावी. आपल्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन  भक्तिभावाने एकादशीची कथा वाचावी. चालीसा देखील वाचा. शक्य असल्यास विष्णू सहस्त्र नामावली वाचावी. दिवस ईश्वराच्या सानिध्यात सात्विक वृत्तीने घालवावा.

Worship of Ekadashi
Winter Healthy Diet: कडाक्याच्या थंडीत आहारात 'तूपाचा' असा करा समावेश...

एकादशीशी संबंधित काही खास गोष्टी-

1- एकादशी व्रत हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे. एकादशीला भगवान विष्णूला पिवळे वस्त्र आणि पिवळे भोग अर्पण केले जातात तर लक्ष्मीला लाल वस्त्र अर्पण केले जातात.

2. एका वर्षात एकूण 24 एकादशी असतात. पण जेव्हा अधिकामाचे वर्ष येते तेव्हा वर्षात आणखी दोन एकादशी जोडल्या जातात. म्हणजेच अधिकामा असताना वर्षभरात एकूण २६ एकादशी असतात.

3. एकादशीचा उपवास अन्नाशिवाय केला जातो. त्यात फळं खाता येतात.

4- दर महिन्याला येणाऱ्या एकादशी व्रतामध्ये दशमीच्या रात्रीपासून द्वादशीच्या पहाटेपर्यंत म्हणजे एकादशीचे व्रत पार पडेपर्यंत अन्न घेतले जात नाही.

5- एकादशी व्रताच्या वेळी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी 'ओम नमो भगवते वासुदेवाय' मंत्राचा सतत जप केला जातो.

6. तुळशीचे रोप भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे एकादशीच्या एक दिवस आधी तुळशीची पाने तोडून ठेवावीत. त्यानंतर भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण करावीत. शास्त्रात तुळशीची पाने कधीही शिळी मानली जात नाहीत.

7- एकादशी तिथीला केस आणि नखे कधीही कापू नयेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com