लॉटरी जिंकण्यासाठी तुम्हाला 'QR कोड' देखील मिळाला आहे का? तुम्हाला मोफत मोबाईल रिचार्जसाठी तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये लिंक आणि स्कॅनर शेअर करा यासारखे विविध ऑफर देणारे मॅसेज मिळतात का? पण तुम्हाला माहित आहे का की असे केल्याने तुमचे बँक अकाउट रिकामे होऊ शकते.
QR कोडद्वारे पेमेंट करणे ही खुप सोपी पद्धत आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे, कोणत्याही ऑनलाइन व्यवहारात जोखीम असते. क्यूआर कोडद्वारे पेमेंट करताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
QR कोडने पेमेंट करताना कोणती काळजी घ्याल
केवळ विश्वासार्ह स्टोअरमधून खरेदी करावे
जेव्हा तुम्ही नवीन दुकानातून खरेदी करत असाल तेव्हा प्रथम त्याबद्दल काही प्राथमिक माहिती मिळवा. स्टोअर विश्वसनीय आहे की नाही हे ठरवण्यासाठी, तुम्ही ऑनलाइन पुनरावलोकने वाचू शकता किंवा मित्र आणि कुटुंबाकडून माहिती मिळवू शकता.
फक्त सुरक्षित QR कोड आणि डिव्हाइस स्कॅन करा
QR कोड स्कॅन करण्यापूर्वी तो सुरक्षित आहे का ते तपासावे. तुमचे डिव्हाइस सुरक्षित ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. तुमचे डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यासाठी, तुम्ही अंकीय पासवर्ड आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरू शकता.
फसवणूक कशी टाळावी
फक्त अधिकृत आणि विश्वसनीय QR स्कॅनिंग अॅप्लिकेशन्स वापरावे. तुम्ही अशी अॅप्लिकेशन्स तुमच्या डिव्हाइसच्या अधिकृत अॅप स्टोअरमधूनच डाउनलोड करावे.
तुमचा स्मार्टफोन आणि अॅप्लिकेशन्स नेहमी नवीनतम सॉफ्टवेअरसह अपडेट ठेवावे. तुम्ही डिव्हाइसची सुरक्षा वाढवू शकता.
QR कोड स्कॅन करण्यापूर्वी, तो तुमच्या सेवेसाठी किंवा उत्पादनासाठी योग्य आहे का ते काळजीपूर्वक तपासावे.
QR स्कॅन करताना सावधगिरी बाळगा आणि जास्त वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
कोणतेही अनधिकृत QR कोड स्कॅन करू नका आणि जेव्हा तुम्ही ऑनलाइन व्यवहार कराल तेव्हा सावध रहा.
हे कसे कार्य करते?
सायबर फसवणूक करणारे तुम्हाला 'QR कोड' पाठवतात आणि तुम्हाला लॉटरी/पैसे जिंकण्याचे आमिष दाखवून कोड स्कॅन करायला लावतात.
तुम्ही स्कॅन करून तुमचा सिक्युरिटी पिन टाकताच, तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे काढले जातात आणि त्यामुळे तुम्ही फसवणुकीला बळी पडता.
हे कसे टाळायचे?
पैसे मिळवण्यासाठी नाही तर फक्त पेमेंट करण्यासाठी 'QR कोड' स्कॅन करावे.
QR कोड कोणी पाठवला आहे हे कळल्याशिवाय तो कधीही स्कॅन करू नका.
तुमच्या मोबाईलची स्क्रीन नेहमी लॉक ठेवा आणि तुमचा UPI पिन इतरांसोबत शेअर करू नका.
भारत सरकारच्या www.cybercrime.gov.in पोर्टलवर सायबर फसवणुकीची तत्काळ तक्रार करा किंवा सरकारी सायबर फ्रॉड हेल्पलाइन क्रमांक 1930 वर कॉल करावा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.