Reuse Of Kids Woolen Coat: मुलांचा उबदार कोट फाटलाय? मग 'या' 3 पद्धतींनी करा घरगुती कामासांठी वापर

जर तुमच्या घरी लहान मुलांचे उबदार फाटलेले कोट असेल आणि तुम्ही फेकून देण्याचा विचार करत असाल तर थांबा. तुम्ही याचा घरगुती कामांसाठी विविध पद्धतीने वापर करू शकता.
Reuse Of Kids Woolen Coat
Reuse Of Kids Woolen CoatDainik Gomantak
Published on
Updated on

how to reuse kids woolen coat home cleaning try simple hacks

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मुलांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी, लोक उबदार कोटचा वापर करतात. पण अनेक वेळा खेळतांना किंवा इतर कारणांमुळे उबदार कोट फाटतात. अनेक लोक कोट निरुपयोगी म्हणून ते फेकून देतात. परंतु तुम्ही या कोटचा पुन्हा वापर करून पैसे वसूल करू शकता. तुम्ही या कोटचा घरगुती कामांसाठी वापर करू शकता.

फरशी पुसण्यासाठी फायदेशीर

उबदार कोट खूप जाड आणि मऊ असते. त्याच्या चांगल्या गुणवत्तेमुळे पुसण्यासाठी वापर करू शकतो. यासाठी कोट लहान आकारात कापून घ्यावा. आता याचा वापर घरातील स्वयंपाकघर, फर्निचर, गॅस, खिडक्या, दरवाजे पुसण्यासाठी करा. उबदार कोट प्रत्येक गोष्ट पुसण्यासाठी फायदेशीर ठरते.

पायपुसणी बनवू शकता

तुम्ही जाड उबदार कोटपासून होममेड पायपुसणी देखील बनवू शकता. सहसा लोक बाजारातून डोअरमॅट खरेदी करतात. हे खूप महाग असतात. जर तुमच्या घरी खराब झालेला मुलांचा उबदार कोट असेल तर त्याला योग्य आकारात कापून शिवून घ्या. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर, बाथरूम आणि बेडरूमच्या गेटवर लावू शकता.

कव्हर बनवू शकता

मुलांचा हिवाळ्यात वापरला जाणारा उबदार कोटमध्ये पांढरे फॅब्रिक असते. यामुळे वॉटरप्रूफ असून ते धूळ कमी करण्यास मदत करते.

तुम्ही पांढऱ्या फॅब्रिकसह उशा आणि इतर घरगुती वस्तूंसाठी कव्हर बनवू शकता. यासाठी कोट कापून आतील फॅब्रिक काढा आणि स्टिच करा आणि कव्हर डिझाइन करा. यामुळे वस्तु खराब होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com