How to Reuse Of Curd Box: घरात अनेक वस्तु अशा असतात की ज्यांचा वापर पुन्हा करत नाही. अनेक वस्तु आपण निरोपयोगी म्हणून फेकून देतो.
तुम्ही दह्याचा डब्बा फेकून देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा. कारण दह्याच्या रिकाम्या डब्ब्यांचा वापर तुम्ही घरगुती कामांसाठी करू शकता.
सामान ठेवण्यासाठी
रिकाम्या दह्याचे डब्बे पुन्हा वापरण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. तुम्ही यामध्ये कंगवा, ब्रश, पेन ठेऊ शकता. तुम्ही या डब्ब्याला रंग देऊन खास बनवू शकता.
सजावटीसाठी वापर
रिकाम्या दह्याचे डब्ब्याचा वापर सजावटीसाठी करू शकता. जर तुमच्या घरी अनेक दह्याचे रिकामे डब्बे जमा झाले असतील तर त्यांना आकर्षक रंग देऊ शकता. तसेच काचा लावून सुंदर सजावट करू शकता. घरात विविध ठिकाणी शो पिस म्हणून ठेऊ शकता.
बर्फासाठी दही कंटेनर पुन्हा वापरा
अनेक लोक फ्रिजमध्ये बर्फ ठेवतात. यासाठी आइस ट्रेचा वापर करतात. तुम्ही रिकाम्या दह्याच्या डब्ब्यांचा देखील दही सेट करण्यासाठ करू शकता.
अनेक वेळा जास्त बर्फ लावण्यासाठी मोठ्या भांड्याचा वापर करतात नंतर बर्फ काढणे कठिण होते. अशावेळी तुम्ही दह्याच्या रिकाम्या डब्यांचा बर्फ लावण्यासाठी करू शकता.
रोप लावण्यासाठी
दह्याचे रिकामे बॉक्स तुम्ही रोपं लावण्यासाठी करू शकता. लहान रोपे लावण्यासाठी तुम्ही दह्याच्या बॉक्सचा वापर करू शकता. यासाठी सर्वात पहिले बॉक्स स्वच्छ करावा.
त्यात माती टाकावी. लाहन रोपं लावावे. तुम्ही ते घराच्या बाहेर आणि आत दोन्ही ठिकाणी ठेवू शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.